Pakistan's honeytrap to break India's security system! Jodhpur jawan arrested for providing confidential information to women

देशाची सुरक्षा व्यवस्था भेदण्यासाठी भारतीय लष्करातील जवानांना हनी ट्रॅपमध्ये(Pakistan Honey Trap) अडकविण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय महिलांची मदत घेत असून या महिलांच्या जाळ्यात जोधपूरमधील एक जवान अडकल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले आहे(Jodhpur jawan arrested for providing confidential information to women).

    जोधपूर : देशाची सुरक्षा व्यवस्था भेदण्यासाठी भारतीय लष्करातील जवानांना हनी ट्रॅपमध्ये(Pakistan Honey Trap) अडकविण्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआय महिलांची मदत घेत असून या महिलांच्या जाळ्यात जोधपूरमधील एक जवान अडकल्यानंतर त्यास ताब्यात घेण्यात आले आहे(Jodhpur jawan arrested for providing confidential information to women).

    जोधपूर मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसचे कर्मचारी राम सिंह यांनी सीमेपलीकडे बसलेल्या या महिलांना सैनिक क्षेत्राची गोपनीय माहिती पाठवायला सुरुवात केली.  मिलिटरी इंजीनीयरिंगमध्ये कार्यरत असलेल्या राम सिंगवर बऱ्याच काळापासून लक्ष ठेवून होते. तो सोशल नेटवर्किंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅपद्वारे पाकिस्तानी गुप्तचर संस्थेला सीमेपलीकडे गोपनीय आणि धोरणात्मक माहिती पाठवत होता. तीन महिन्यांत त्याने अनेक महत्वाची माहिती पाठवली आहे.

    यासाठी त्याला अटक करण्यात आली होती आणि जोधपूरमध्ये त्याची चौकशी केली जात होती. मंगळवारी गुप्तचर यंत्रणा त्याला जयपूरला घेऊन गेली. आता जयपूरमधील गुप्तचर संस्थांकडून संयुक्त चौकशी करण्यात येणार आहे.त्याच्या फोनवरून अनेक महत्त्वाची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाल्याचे प्राथमिक चौकशी आणि तपासात समोर आले आहे. तपासादरम्यान, त्याच्या फोनवरून लष्कराच्या अनेक पत्रांची छायाचित्रे सापडली जी त्याने सीमे पलीकडे पाठवली.