40 bodies found floating in Ganges at Buxar on UP-Bihar border; The administration claims that the bodies are being transported from Uttar Pradesh

कोरोना वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशपासून बिहारपर्यंत गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांविषयीच्या घटना समोर येत आहेत. राजकीय पक्षांकडुन आरोप लावण्यात येत आहे की, कोरोना संक्रमणाने मृत्यू झाल्यानंतर मृतदेहांना नदीत सोडण्यात येत आहेत. अनेक प्रकारचे आरोप लागत आहेत. याचा परिणाम बिहारपासून बंगालच्या मासोळी बाजारावर दिसत आहे. जेव्हापासून गंगा नदीत मृतदेह मिळत आहेत, तेव्हापासून बंगालच्या अनेक जिल्ह्यांपासून बिहारच्या पाटणासहित आजूबाजूच्या जिल्ह्यात मासे विक्री कमी झाली आहे. कोरोना संकटात जारी लॉकडाऊन व काहीच तास दुकान उघडण्याची परवानगी यामुळे मासे विकल्या जात नसल्यामुळे दुकानदार त्रासले आहेत.

  लखनौ : कोरोना वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशपासून बिहारपर्यंत गंगा नदीत वाहणाऱ्या मृतदेहांविषयीच्या घटना समोर येत आहेत. राजकीय पक्षांकडुन आरोप लावण्यात येत आहे की, कोरोना संक्रमणाने मृत्यू झाल्यानंतर मृतदेहांना नदीत सोडण्यात येत आहेत. अनेक प्रकारचे आरोप लागत आहेत. याचा परिणाम बिहारपासून बंगालच्या मासोळी बाजारावर दिसत आहे. जेव्हापासून गंगा नदीत मृतदेह मिळत आहेत, तेव्हापासून बंगालच्या अनेक जिल्ह्यांपासून बिहारच्या पाटणासहित आजूबाजूच्या जिल्ह्यात मासे विक्री कमी झाली आहे. कोरोना संकटात जारी लॉकडाऊन व काहीच तास दुकान उघडण्याची परवानगी यामुळे मासे विकल्या जात नसल्यामुळे दुकानदार त्रासले आहेत.

  सर्वांत मोठ्या बाजाराची खालवली स्थिती

  उत्तर दिनाजयपूरच्या रायगंजविषयी सांगायचे झाले तर लॉकडाऊनमध्ये बाजारात भरपूर प्रमाणात मासे येत आहेत. परंतु, कोणीही ते मासे खरेदी करत नाही. यामुळे मासे व्यावसायिक चिंतेत आहेत. मासे व्यापाऱ्यांनुसार, उत्तरप्रदेश व बिहारमध्ये गंगा नदीत मृतदेह मिळाल्यामुळे ग्राहक घाबरलेले आहेत. बंगाली समुदायात मासे खूप लोकप्रिय आहेत. दुसरीकडे, त्यांच्यात दहशतीची स्थिती आहे. बहुतांशी लोकांनी मासे खाणे बंद केले आहे. उत्तर बंगालच्या सर्वांत मोठ्या मोहनबती मासे बाजारात माश्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात घट पाहायला मिळत आहेत.

  बाजारावर वाईट परिणाम

  व्यापाऱ्यांनुसार मोहनबती बाजारात दर दिवशी 6 ते 8 लाख रुपयांचा मासेविक्रीचा व्यवसाय होतो. कोरोना संकटता व्यापारात सतत घट पाहायला मिळत आहे. लॉकडाऊनमुळे गाड्या येत नाहीत. त्यातही प्रमाण कमी झाले आहे. सिलिगुडी बाजारात दररोज 80 ते 100 टन माश्यांचा व्यवसाय होत होता. येथून मासे नेपाळ, भूतान, आसाम, सिक्किमपर्यंत पाठविले जात होते. आज हाच व्यापार 10 टनापर्यंत घसरला आहे. कोरोना संकटाच्या पूर्वी दररोज 10 हजार गाड्या येत होत्या. आज फक्त एखादी गाडी येते. एक ते दीड कोटींचा व्यापार 20 ते 25 लाखांपर्यंत घसरला आहे.

  ग्राहकांमध्ये भीती

  व्यापारी व दुकानदारांनुसार, गंगा नदीतून मृतदेह मिळाल्याच्या बातम्यांमुळे ग्राहक घाबरले आहेत. यात अचानक मासे खरेदी करणाऱ्यांच्या संख्येत घट होत चालली आहे. या भागाशिवाय संपूर्ण बंगाल मासे शौकीन आहे. गंगा नदी बंगालच्या अनेक जिल्ह्यातून जाते. सुंदरवन डेल्टातून गंगा नदी बंगालच्या खाडीत प्रवेश करते. पौराणिक गंगा नदीचे धार्मिक तसेच आर्थिक महत्त्व आहे. या नदीशी अनेक प्रकारचे रोजगार जोडले गेलेले आहेत, ज्यात माशांचाही व्यवसाय आहे. परंतु काही दिवसांपासून देशातील कोरोना संकटात गंगा नदीतून मृतदेह मिळाल्यामुळे मासे खरेदीवर परिणाम झाला आहे. यामुळे व्यापारी व दुकानदार प्रभावित झाले आहेत.