उत्तराखंडला पावसाचं वरदान, पावसामुळं जंगलांमधील आगीवर नियंत्रण, धगधग मात्र कायम

उत्तराखंडमधील सुमारे ४५ जंगलांमध्ये वणवे पेटलेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफचे जवान हेलिकॉप्टरच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सातत्यानं नवनवे वणवे पेटत असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश येत नव्हतं. अखेर पावसानेच उत्तराखंडमध्ये हजेरी लावल्यामुळे यंत्रणांना मोठा दिलासा मिळालाय. पावसामुळे अनेक ठिकाणचे वणवे शांत झाले असून काही भागात मात्र धुगधूग कायम असल्याचं चित्र आहे. 

    उत्तराखंडमधील जंगलांना गेल्या आठ दिवसांपासून आग लागली आहे. ही आग गेले काही दिवस वाढत चालली होती. त्यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न असफल होत होते. मात्र निसर्गाच्या कृपेनं आता त्यावर नियंत्रण मिळवण्यात यश येताना दिसतंय.

    उत्तराखंडमधील सुमारे ४५ जंगलांमध्ये वणवे पेटलेत. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. एनडीआरएफचे जवान हेलिकॉप्टरच्या मदतीनं आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र सातत्यानं नवनवे वणवे पेटत असल्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यात यश येत नव्हतं. अखेर पावसानेच उत्तराखंडमध्ये हजेरी लावल्यामुळे यंत्रणांना मोठा दिलासा मिळालाय. पावसामुळे अनेक ठिकाणचे वणवे शांत झाले असून काही भागात मात्र धुगधूग कायम असल्याचं चित्र आहे.

    मात्र हा केवळ अवकाळी पावसाने दिलेला दिलासा असल्यामुळे भविष्यात हे वणवे पुन्हा पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. अजूनही दीड महिना कडाक्याचा उन्हाळा असणार आहे. त्यामुळे पाऊस संपल्यानंतर पुन्हा उष्णता वाढू लागेल आणि पुन्हा वणवे पेटायला सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येतो. दरवर्षी निसर्गचक्रानुसार उन्हाळ्याच्या शेवटी जंगलांना आग लागते आणि पालापाचोळा जळून जातो. त्यानंतर पाऊस सुरू होतो आणि आग शांत होते. मात्र यंदा उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच अशी आग लागल्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालंय.

    पावसामुळे आग आटोक्यात आली असली तरी यंत्रणांनी सर्व तयारी ठेवली आहे. भविष्यात पुन्हा वणवे पेटले, तरी ते नियंत्रणात ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती उत्तराखंड प्रशासनानं दिलीय.