pc chako

केरळ विधानसभा निवडणुकीच्या(keral election) तोंडावर चाको(pc chako in rashtrawadi) यांनी पक्ष सोडत गटबाजी होत असल्याचा आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. गेल्या एका वर्षाच्या आत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर चाको असे दुसरे मोठे नेते आहेत ज्यांनी पक्ष सोडला आहे.

    तिरुवनंतपूरम: केरळ काँग्रेसचे (keral congress)माजी नेते पीसी चाको (PC chako to go in rashtrawadi)आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या नव्या पक्षात त्यांच्यावर कोणती जबाबदारी असणार आहे, याविषयी काहीही स्पष्ट झालेले नाही.

    केरळ विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर चाको यांनी पक्ष सोडत गटबाजी होत असल्याचा आरोप करत पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. गेल्या एका वर्षाच्या आत ज्योतिरादित्य शिंदे यांच्यानंतर चाको असे दुसरे मोठे नेते आहेत ज्यांनी पक्ष सोडला आहे. चाको काँग्रेस कार्यसमितीचे सदस्यदेखील होते. गेल्या अनेक दिवसांपासून ते पक्ष सोडण्याच्या विचारात असल्याचे त्यांनी सांगितले होते.