कोरोना व्हॅक्सिनच्या भितीने गावात उडाली एकच खळबळ…लोकांनी मारल्या नदीत उड्या, नक्की काय झालं ?

बाराबंकी जिल्ह्यातील रामनगर तालुक्यातील सिसौडा गावात लसीकरणासाठी पथक पोहोचले होते. या पथकाने गावात लसीकरण सुरू करण्याची घोषणा करताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी पळापळ सुरू केली. काही जणांनी गावाबाहेर धाव घेत गावाबाहेर असलेल्या शरयू नदीत उड्या घेतल्या. याबाबत आरोग्य पथकाला समजताच तेही ग्रामस्थांची समजून घालण्यासाठी नदीच्या दिशेने गेले.

    बाराबंकी – देशात कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातल्याने चिंतेची परिस्थिती आहे. त्यामुळे लसीकरण वाढवण्याची मागणी केली जात आहे. मात्र कोरोनाविरोधात या लसीबाबत अनेकांच्या मनात गैरसमज निर्माण झालेला आहे. (Corona vaccination) त्याचाच प्रत्यय उत्तर प्रदेशातील बाराबंकी जिल्ह्यातील एका गावामध्ये आला.

    येथे येथील सिसौडा गावामध्ये लस देण्यासाठी गेलेल्या आरोग्य पथकाला पाहून लोक घाबरले. या पथकाच्या तावडीत सापडलो तर लस घ्यावी लागेल. या भयाने गावकऱ्यांनी शरयूसारख्या मोठ्या नदीत उड्या मारल्या. हा प्रकार पाहून आरोग्य विभागाचे पथक घाबरले.

    पथकामधील अधिकारी लोकांना नदीबाहेर येण्याची विनंती करू लागले. अखेर उपजिल्हाधिकाऱ्यांनी समजूत घातल्यावर ग्रामस्थ नदीबाहेर आले. मात्र त्यांच्यापैकी केवळ १४ जणांनीच लस घेतली.

    बाराबंकी जिल्ह्यातील रामनगर तालुक्यातील सिसौडा गावात लसीकरणासाठी पथक पोहोचले होते. या पथकाने गावात लसीकरण सुरू करण्याची घोषणा करताच ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. अनेकांनी पळापळ सुरू केली. काही जणांनी गावाबाहेर धाव घेत गावाबाहेर असलेल्या शरयू नदीत उड्या घेतल्या. याबाबत आरोग्य पथकाला समजताच तेही ग्रामस्थांची समजून घालण्यासाठी नदीच्या दिशेने गेले. या पथकाला पाहून अजून काही ग्रामस्थांनी नदीत उड्या घेतल्या. हा अनपेक्षित प्रकार पाहून आरोग्य पथकही घाबरले. तसेच ग्रामस्थांना नदीबाहेर विनवू लागले.

    बाराबंकी जिल्हा मुख्यगावापासून ७० किमी दूर आहे. १५०० लोकसंख्या असणाऱ्या गावांमध्ये शिक्षणाची आणि साक्षरतेची कमी आहे. अधिक प्रमाणात येथील लोक अशिक्षित आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची एक टीम लसीकरणासाठी जेव्हा गावात पोहोचली तेव्हा गावात एकच धांदल उडाली. तसेच आरोग्य कर्मचारी ज्या व्यक्तींशी बोलत होते. तेव्हा त्यांनी एकच धूम ठोकली.