पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. आज पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 89.53 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. यापूर्वी सोमवारी पेट्रोल 35 पैशांनी महाग झालं होतं. 

  नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत आज पेट्रोलनं शंभरी पार केली आहे. आज पेट्रोलच्या दरात 35 पैसे तर डिझेलच्या दरात 17 पैशांनी वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रति लिटर, तर डिझेल 89.53 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. यापूर्वी सोमवारी पेट्रोल 35 पैशांनी महाग झालं होतं.

  दोन महिन्यांत 9.81 रुपयांनी महागलं 

  गेल्या दोन महिन्यांपासून देशात इंधन दरवाढीचं सत्र सुरुच आहे. देशाच्या राजधानीत 1 मे रोजी पेट्रोलचे दर 90.40 रुपये प्रति लिटर इतका होता. तर आज पेट्रोल 100 रुपये 21 पैसे प्रति लिटरनं विकलं जात आहे. गेल्या 68 दिवसांत 9.81 रुपेयांनी पेट्रोलच्या किमतींत वाढ झाली आहे. तर डिझेलची किंमत गेल्या दोन महिन्यांपासून 8.80 रुपये प्रति लिटरनं वाढली आहे. मे आणि जून दरम्यान 61 दिवसांत 32 दिवशी इंधनाच्या दरांत वाढ झाली आहे.

  पेट्रोल आणि डिझेलचे दर कसे पाहाल?

  इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. तसेचं इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx  पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.

  पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत