पश्चिम बंगालमध्ये कोरोना लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर आता मोदींऐवजी ममता बनर्जींचा फोटो

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या लस धोरणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करत असतात. तसेच सर्व लोकांना मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात सीएम ममता बॅनर्जी यांनी मुख्य मंदिरातील पुजार्‍यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिलेत. आता तिसर्‍या टप्प्यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो लावण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  नवी दिल्लीः पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यातील संघर्ष थांबण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत लसीकरण सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो पाहायला मिळायचे, परंतु आता लसीकरण कार्यक्रमाच्या तिसऱ्या टप्प्यात बंगालच्या 18 ते 44 वयोगटातील लोकांच्या लसीकरण प्रमाणपत्रात पश्चिम बंगालच्या सीएम ममता बॅनर्जी यांचे फोटो ठेवले जात आहेत.

  पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्र सरकारच्या लस धोरणावर सातत्यानं प्रश्न उपस्थित करत असतात. तसेच सर्व लोकांना मोफत लस देण्याची मागणी करत आहेत. यासंदर्भात सीएम ममता बॅनर्जी यांनी मुख्य मंदिरातील पुजार्‍यांचे लसीकरण करण्याचे निर्देश दिलेत. आता तिसर्‍या टप्प्यात बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे फोटो लावण्यात येणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

  विधानसभा निवडणुकीदरम्यान लसीकरणाच्या सर्टिफिकेटवर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोबाबात टीएमसीने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. तृणमूलने आपल्या तक्रारीत दिले होते की, कोविड-१९ च्या लसीकरणाच्या प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असणं हे निवडणुकीच्या आचार संहितेचं उल्लंघन आहे. पश्चिम बंगालमध्ये सत्तारूढ तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला सांगितलं होतं की, पश्चिम बंगाल आणि अन्य निवडणूक राज्यात को-विन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या कोविड-१९ लसीकरण प्रमाणपत्रावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो असणं आदर्श आचार संहितेचं उल्लघन असल्याचं सांगितलं होतं.

  नागरिकांना निशुल्क लस देतेय सरकार

  बंगाल सरकार नागरिकांना निःशुल्क लस देत आहे. ममता बनर्जींनी सांगितलं होतं की, प्रत्येक लशीसाठी ६०० ते १२०० रुपये खर्च होत आहेत. १.४ कोटी नागरिकांना लस देण्यात आली आहेत. जर १८ वयापर्यंत पाहिलं तर बंगालमध्ये ८ कोटी लोक राहतात. यासाठी राज्याकडून केंद्राकडे लसीकरणाची मागणी केली जात आहे.

  Photo of Mamata Banerjee instead of Modi on corona vaccination certificate in West Bengal