भारताच्या क्रिकेट ताफ्यात १९ खेळाडू, सामन्यात कुणाला मिळणार संधी?

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सिरीजसाठी भारताच्या ताफ्यात 19 खेळाडू आहेत. कसोटी मालिका 3-1ने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे कुणाला संधी द्यायची? यावरुन संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे.

    अहमदाबाद (Ahmadabad). इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेला 12 मार्चपासून सुरुवात होत आहे. या मालिकेत एकूण 5 सामने खेळवण्यात येणार आहेत. हे सर्व सामने अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहेत. या सिरीजसाठी भारताच्या ताफ्यात 19 खेळाडू आहेत. कसोटी मालिका 3-1ने जिंकल्यानंतर भारतीय संघाचा आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळे कुणाला संधी द्यायची? यावरुन संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी वाढली आहे.

    पहिल्या तीन सामन्यांसाठी बॅलन्स प्लेइंग 11 आणि उर्वरित दोन सामन्यांसाठी काही बदल करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या वर्षा अखेरीस भारतात टी-20 वर्ल्डकप होणार असून त्याच्या तयारीच्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरणार आहे.

    संघात अनेक दिग्गज खेळाडू तसंच नवखे पण प्रतिस्पर्धी टीमचा धु्व्वा उडवण्यास सक्षम असलेले नवोदित खेळाडूंचा समावेश आहे. शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाची निवड कशी होते, हे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, कर्णधार विराट कोहली आणि गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण यांच्यावर ठरणार आहे. प्रथम मालिका विजय मिळून मग प्रयोग करण्याचा विचार होऊ शकतो. अशा परिस्थितीत मालिका विजयानंतर कमी अनुभव असलेल्या खेळाडूंना नंतर संधी दिला जाऊ शकते. याचाच अर्थ पहिल्या तीन सामन्यांसाठी अतिशय बॅलन्स असलेली टीम कर्णधार कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री निवडतील. आणि उर्वरित दोन सामन्यांत काही बदल करतील.

    सलामीवीर कोण? शिखर, रोहित की राहुल ?
    आतापर्यंत टी 20 क्रिकेटमध्ये रोहित शर्मा आणि डावखुरा शिखर धवन हे समीकरण झालं होतं. मात्र गेले काही दिवस के.एल.राहुलचं धावांचं सातत्य आणि आयपीएलमधली कामगिरी राहिली तर नक्कीच सलामीवीरांध्ये स्पर्धा वाढल्याचं जाणवतं. धवनने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 150 रन्सच्या आसपास रन्स बनवले. त्यामुळे शिखरला ओपन करण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर रोहितला सध्या तरी कोण तोडीस तोड नाहीय. त्यामुळे रोहितची जागा फिक्स आहे. तर मग प्रश्न उरतो राहुलचा.जर राहुलला संघात घ्यायचे असेल तर राहुलला कोणच्या नंबरवर संघ व्यवस्थापन खेळायला लावणार?, हा मोठा प्रश्न आहे.

    दरम्यान, कर्णधार कोहली तिसऱ्या क्रमाकांवर खेळतो. तर पंत आणि हार्दिक पांड्या अनुक्रमे पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर खेळतात. मग अशा परिस्थितीत चौथ्या क्रमांकावर राहुल खेळेल काय? असा प्रश्न विचारताना या क्रमाकांवर खेळण्यासाठी सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर देखील उत्सुक आहेत.

    गोलंदाजीतही स्पर्धा
    गोलंदाजीमध्येही भारताकडे बरेच ऑप्शन आहेत. भुवनेश्वर कुमार बऱ्याच दिवसांतून संघात पुनरागमन करत आहे. भुवीची दीपक चहर आणि शार्दुल ठाकुरबरोबर स्पर्धा असेल. खरंतर भुवीचा अनुभव आणि शेवटच्या ओव्हरमधील प्रभावी गोलंदाजी यामध्ये तो चहरला मागे टाकेल. पण एवढ्यात त्याने मुश्ताक अली ट्रॉफीशिवाय अधिक मॅचेस खेळलेल्या नाहीत. युजवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर आणि अक्षर पटेलला टी 20 निर्विवादपणे स्थान मिळू शकते. तर दुसरीकडे टी नटराजन आणि नवदीप सैनी आपला जलवा दाखवण्यास उत्सुक आहेत.