पंतप्रधान मोदी सोमनाथ मंदिर ट्रस्टचे नवे अध्यक्ष, जबाबदारी स्विकारणारे दुसरे पंतप्रधान

सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांच्या ऑनलाईन बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना या ट्रस्टचं अध्यक्षपद भूषविण्याची विनंती करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी या जबाबदारीचा स्वीकार करत सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे आभार मानले. भविष्यात भाविकांसाठी अधिकाधिक सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, असंही त्यांनी म्हटले.

गुजरातमधील प्रसिद्ध सोमनाथ मंदिराच्या अध्यक्षपदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे माजी पंतप्रधान मोरारजी देसाई यांच्यानंतर या पदावर विराजमान होणारे नरेंद्र मोदी हे भारताचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत.

सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या सर्व विश्वस्तांच्या ऑनलाईन बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना या ट्रस्टचं अध्यक्षपद भूषविण्याची विनंती करण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी या जबाबदारीचा स्वीकार करत सोमनाथ मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे आभार मानले. भविष्यात भाविकांसाठी अधिकाधिक सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न करू, असंही त्यांनी म्हटले.

यापूर्वी गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांच्याकडे सोमनाथ मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षपदाची जबाबदारी होती. २००४ सालापासून २०२० पर्यंत एकूण सोळा वर्ष पटेल हे सोमनाथ मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष होते. त्यांच्या निधनानंतर हे पद रिक्त होतं. त्या ठिकाणी आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवड करण्यात आली आहे.

सोमनाथ ट्रस्टच्या विश्‍वस्त मंडळात भाजप नेते लालकृष्ण अडवाणी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि व्यापारी हर्षवर्धन नेवतिया यांचाही समावेश आहे. यापूर्वी पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी १९६७ ते १९९५ या कालावधीत मंदिराच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली होती.