कनोडिया बंधूंना पंतप्रधान मोदींची श्रद्धांजली

काही दिवसांपूर्वीच निधन झालेले गुजराती सिनेमातील सुपरस्टार नरेश कनोडिया आणि त्यांचे बंधू महेश कनोडिया यांच्या कुटुंबीयांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट घेतली. कनोडिया बंधूंच्या निधनानं गुजराती सिनेमाची मोठी हानी झाल्याचं सांगत त्यांनी कुटुंबीयांचं सांत्वन केलं.

नरेश कनोडिया यांनी गुजराती सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवलं. त्यांची पडद्यावरील एन्ट्री जशी धमाल उडवून द्यायची, तशी त्यांची एक्झिटही सगळ्यांनाच चटका लावून गेली. दोन दिवसांच्या अंतरानं दोघांनीही या जगाचा निरोप घेतला.

नरेश कनोडिया यांना कोरोना झाला होता. अहमदाबादच्या कोविड रुग्णालयात ते दाखल होते. उपचारादरम्यान मंगळवारी त्यांचं निधन झालं. तर त्यांच्या दोन दिवस आधी, म्हणजेच २५ ऑक्टोबरला महेश कनोडिया यांनी राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला.

महेश कनोडिया हे गुजरातच्या पाटनमधून लोकसभेवर निवडून गेले होते. नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेश कनोडिया यांना त्यांनी पक्षात आणलं होतं. नरेश कनोडिया हे आमदार झाले होते.