पंतप्रधान मोदींचा थेट राज्यपाल जगदीप धनखर यांना फोन ; राज्यपाल म्हणाले…

राज्यपालांनी मंगळवारी ट्विट केले की, अहवाल एक भीतिदायक परिस्थिती दर्शवितो. घाबरलेले लोक स्वत: चा बचाव करण्यासाठी पळत आहेत. हत्या आणि संहार घडवून आणला जात आहे. संवैधानिक मूल्यांशी केलेली तडजोड कधीही गृहित धरली जाऊ शकत नाहीत. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही यंत्रणा तात्काळ हाताळली पाहिजे.

    कोलकाता: पश्चिम बंगाल निवडणूक निकालाच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखर (Governor Jagdeep Dhankhar) यांना फोन करून चिंता व्यक्त केलीय. या प्रकरणात केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगाल सरकारकडून अहवाल मागविलाय. विशेष म्हणजे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा पश्चिम बंगालमध्ये येत आहेत आणि संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांची भेट घेणार आहेत.

    यापूर्वी राज्यपालांनी मंगळवारी पोलीस महासंचालक (DG) पी. नीरजनयन आणि कोलकाता पोलीस (CP) चे आयुक्त सोमेन मित्र यांच्याकडून त्वरित अहवाल मागविलाय. मंगळवारी डीजी आणि सीपी यांनी राज्यपालांची भेट घेऊन त्यांना संबंधितांवर कारवाईचे आश्वासन दिलेय. असे असूनही हिंसाचार थांबण्याचे नाव घेत नाही.