उज्जैनमधील महाकाल परिसरातील मशिदीच्या अतिक्रमित भागावर पोलिसांची कारवाई, सर्वोच्च न्यायालयाने दिले होते आदेश

एडीएम नरेंद्र सूर्यवंशी आणि एएसपी अमरेंद्र सिंह (ADM Narendra Suryavanshi and ASP Amarendra Singh) यांनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) आदेशानुसार महाकाळ परिसरातील ५०० मीटरच्या परिघामधील अतिक्रमण हटविण्याची कारवाई पुढे सुरूच ठेवली जाईल.

मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh ) उज्जैन येथील महाकाल परिसरात काल गुरूवारी सकाळी रुद्रसागराजवळ मशिदीचा अतिक्रमित भाग तोडण्यात आला. एडीएम नरेंद्र सूर्यवंशी आणि एएसपी अमरेंद्र सिंह (ADM Narendra Suryavanshi and ASP Amarendra Singh) यांनी सांगितलं की, सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) आदेशानुसार महाकाल परिसरातील ५०० मीटरच्या परिघामधील अतिक्रमण हटविण्याची कारवाई पुढे सुरूच ठेवली जाईल.

सकाळपासूनच ५०० मीटर परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करून कारवाई करण्यात आली. रुद्रसागरकडे जाणारे सर्व रस्तेही बॅरिकेड्सने रोखण्यात आले. या कारवाईमुळे आसपासच्या भागात खळबळ उडाली. कोणत्याही अप्रिय परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी ६३० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले होते. तथापि, तणावाची परिस्थिती उद्भवली नाही.

पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या मदतीने मशिदीचा अवैध भाग पाडला. सकाळी ११ वाजेपर्यंत कारवाई सुरू होती. मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधील अतिक्रमण मोहिमेचा आढावा घेतला.

मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दोन दिवसांपूर्वी विभागस्तरीय अतिक्रमण मोहिमेचा आढावा घेतला. प्रशासकीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अतिक्रमण मोहिमेसंदर्भात अधिकाऱ्यांच्या आळशीपणाबद्दल मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. परिणामी, मशिदीचा अवैध भाग पाडण्याची कारवाई करण्यात आली. यासाठी जिल्हा व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आपत्कालीन बैठक घेऊन रणनीती आखली.