आसाममध्ये पोलीस-स्थानिक संघर्ष, पोलिसांचा स्थानिकांवर गोळीबार ; दोघांचा मृत्यू

आसाम (Assam) राज्यातील दरांग जिल्हयामध्ये आज (गुरूवार) येथील पोलीस आणि स्थानिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. मोहिमेदरम्यान करण्यात आलेलं अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांवर (Police Firing On Citizens)  गोळीबार केला.

    आसाम (Assam) राज्यातील दरांग जिल्हयामध्ये आज (गुरूवार) येथील पोलीस आणि स्थानिकांमध्ये संघर्ष सुरू आहे. मोहिमेदरम्यान करण्यात आलेलं अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांनी स्थानिकांवर (Police Firing On Citizens)  गोळीबार केला. यामध्ये दोघांचा मृत्यू ( Two Deaths) झाला आहे. तर ९ पोलीस गंभीर जखमी झाले आहेत. या संघर्षाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल होत आहे.

    मिळालेल्या माहितीनुसार, दरांग जिल्ह्यात अतिक्रमण हटविण्यासाठी पोलिसांनी झडप घातली. परंतु सिपाहझारमध्ये झालेल्या या हल्ल्यात २ स्थानिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. तरीसुद्धा पोलिसांनी शांतता बाळगली. परंतु स्थानिकांचा आक्रोश पाहून पोलिसांनी गोळीबार करण्याचा मोठा निर्णय घेतला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.