Police have arrested two vagrants from Uttar Pradesh for stealing women's underwear

पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेली महिलांची अंतर्वस्त्रे हस्तगत केली आहेत. मेरठमधील सदर बाजार भागात राहणारे काही तरुण हे परिसरातील तरुणींच्या अंडरगार्मेंट्सची चोरी करत होते. त्यांचे हे कृत्य CCTV कॅमेऱ्यातही कैद झाले होते. स्थानिकांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

    लखनौ : घराबाहेर वाळत घातलेली महिलांची अंतर्वस्त्रांची चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशमधील दोघा भामट्यांना पोलिसांनी अटक केली आहे. अटक झाल्यांनतर त्यांनी दिलेला कबुली जबाब ऐकून पोलिसही चक्रावले आहेत.

    पोलिसांनी आरोपींकडून चोरी केलेली महिलांची अंतर्वस्त्रे हस्तगत केली आहेत. मेरठमधील सदर बाजार भागात राहणारे काही तरुण हे परिसरातील तरुणींच्या अंडरगार्मेंट्सची चोरी करत होते. त्यांचे हे कृत्य CCTV कॅमेऱ्यातही कैद झाले होते. स्थानिकांनी याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

    CCTV फुटेजमुळे या आरोपींना जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले. तंत्र मंत्र विद्या किंवा अंधश्रद्धेतून अंतर्वस्त्रांची चोरी होत असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र, वाईट हेतूनेच आपण महिलांची अंतर्वस्त्र चोरल्याची कबुली या चोरट्यांनी दिली आहे.