मास्क नाय तर माफी नाय, मास्क न लावल्याबद्दल पोलिसानेच फाडली पोलिसाची पावती, सोशल मीडियावर फोटो व्हायरल

आंध्रप्रदेशमध्ये तर मास्क न लावता फिरणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यावरच दुसऱ्या ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्याने कारवाई केली. आंध्रप्रदेशातल्या गुंटुरमध्यो पोलीस अधीक्षक आर. एन. अमीरेड्डी हे राऊंडवर होते. रस्त्यावरील परिस्थिती आणि पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत होते. यावेळी ट्रॅफिक इन्स्पेक्टर मल्लिकार्जून राव मास्क न लावताच गाडीवरून फिरत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब त्यांना रोखलं आणि मास्क न लावण्याचं कारण विचारलं. 

    गेल्या काही आठवड्यांपासून देशात कोरोनाचा उद्रेक पुन्हा वाढायला सुरुवात झाली. देशातल्या जवळपास सर्वच राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली असून मोठ्या संख्येनं कोरोना रुग्ण आढळायला सुरुवात झालीय. या पार्श्वभूमीवर मास्क न वापरता बाहेर फिरणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत.

    आंध्रप्रदेशमध्ये तर मास्क न लावता फिरणाऱ्या एका पोलीस अधिकाऱ्यावरच दुसऱ्या ऑन ड्युटी पोलीस अधिकाऱ्याने कारवाई केली. आंध्रप्रदेशातल्या गुंटुरमध्यो पोलीस अधीक्षक आर. एन. अमीरेड्डी हे राऊंडवर होते. रस्त्यावरील परिस्थिती आणि पोलीस बंदोबस्ताचा आढावा घेत होते. यावेळी ट्रॅफिक इन्स्पेक्टर मल्लिकार्जून राव मास्क न लावताच गाडीवरून फिरत असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी ताबडतोब त्यांना रोखलं आणि मास्क न लावण्याचं कारण विचारलं.

    आपल्याला कुणी रोखेल, अशी कदाचित मल्लिकार्जून यांनी कल्पनाच केली नसेल. त्यामुळे सुरुवातीला त्यांना थोडा धक्काच बसला. मात्र खुद्द पोलीस अधिक्षकांनीच रोखल्यामुळे त्यांचा नाईलाज झाला. आपण गडबडीत मास्क लावायला विसरलो, असं उत्तर त्यांनी दिलं. त्यावर अधिक्षकांना एक नवा मास्क घेऊन त्यांच्या चेहऱ्याला लावला आणि झालेल्या चुकीबद्दल त्यांच्याकडून १०० रुपयांचा दंडदेखील वसूल केला.

    आजूबाजूच्या पोलिसांनी आणि नागरिकांनी हा प्रकार आपल्या मोबाईलमध्ये शूट केला. सध्या हा व्हिडिओ आंध्र प्रदेशात चांगलाच व्हायरल होतोय. मात्र पोलिसांनी पोलिसांकडूनही दंड वसूल केल्याने आपली काही खैर नाही, हा संदेश विनामास्क फिरणाऱ्यांना यातून नक्कीच मिळालाय.