lizard found at dinner at hotel; Bouncers beat the complaining youth

पालीला पळवणे पोलिस अधिकाऱ्याच्या जीवावर बेतले आहे. पालीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे.

    गुंटूर : पालीला पळवणे पोलिस अधिकाऱ्याच्या जीवावर बेतले आहे. पालीला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आंध्र प्रदेशमध्ये घडली आहे.

    गुंटूर जिल्ह्यात रविवारी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. मृत पोलीस अधिकाऱ्याचे नाव शेष राव असे आहे.

    घराच्या छतावर असलेल्या पालीला हातात झाडू घेवून पळवत असताना जिन्यांवरुन तोल जाऊन ते दुसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याचे CCTV फुटेजमध्ये दिसत आहे.

    उंचावरु कोसळल्याने शेष यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने पोलीस अधिकाऱ्याच्या कटुंबीयांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना धक्का बसला आहे.