प्रतीकात्मक फोटो
प्रतीकात्मक फोटो

नक्षल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान शनिवारी सकाळी बालाघाट पोलिसांना मोठे यश आले. किरनापूर पोलिस स्टेशन हद्दीतील किन्ही चौकींतर्गत येणाऱ्या बोरवन जंगलात पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी यांच्या नेतृत्वात सुरक्षा दलांनी चकमकीदरम्यान २ महिला नक्षल्यांचा खात्मा केला. किन्ही चौकीअंतर्गत बोरबंद गावात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षली शोभा आणि भादो या मारल्या गेल्या, अशी माहिती आहे. शोभा माजी नक्षल कमांडर राकेश याची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे.

बालाघाट (Balaghat).  नक्षल्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईदरम्यान शनिवारी सकाळी बालाघाट पोलिसांना मोठे यश आले. किरनापूर पोलिस स्टेशन हद्दीतील किन्ही चौकींतर्गत येणाऱ्या बोरवन जंगलात पोलिस अधीक्षक अभिषेक तिवारी यांच्या नेतृत्वात सुरक्षा दलांनी चकमकीदरम्यान २ महिला नक्षल्यांचा खात्मा केला. किन्ही चौकीअंतर्गत बोरबंद गावात पोलिस आणि नक्षल्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन नक्षली शोभा आणि भादो या मारल्या गेल्या, अशी माहिती आहे. शोभा माजी नक्षल कमांडर राकेश याची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे.

ओडिशातही महिला नक्षली ठार
ओडिशाच्या कंधमाल जिल्ह्यात सुरक्षा रक्षकांसोबत झालेल्या चकमकीत एक महिला नक्षली ठार झाली. राज्याचे पोलिस महासंचालक अभय यांनी सांगितले की, गोछापाडा पोलिस स्टेशन हद्दीतील एका गावाजवळ सुरक्षा रक्षक आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाली. यात एका महिला नक्षलीला टिपण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले. पोलिसांनी चकमकस्थळावरून 2 बंदूक, 4 गोळ्यांच्या फैरी, नक्षली साहित्य जप्त केले आहे.