काँग्रेसकडे बहुमत नाही, भाजपची इच्छा नाही, पुदुच्चेरीत राजकीय पेच

काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने पुदुच्चेरीतील आपले बहुमत गमावले. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचा दावा विरोधी पक्ष भाजपने केला होता. या आरोपांनतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राजीनामा देत सरकार विसर्जित केलं. याच दरम्यान, पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल डॉ. किरण बेदी यांनी अचानक राजीनामा देऊन पद रिक्त केलं. सध्या उपराज्यपलाचा भार तमिलसाई सुंदररंजन यांच्याकडे आहे. 

    पुदुच्चेरीमध्ये काँग्रेसनं आपलं बहुमत गमावल्यानंतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राजीनामा दिला. त्यामुळे पुदुच्चेरीत नवे सरकार कोण स्थापन करणार, असा प्रश्न उभा राहिला आहे. पुदुच्चेरीत विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना उरलेल्या काही महिन्यांसाठी कुणाचे सरकार सत्तेत येणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

    काँग्रेसच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने पुदुच्चेरीतील आपले बहुमत गमावले. त्यानंतर सरकार अल्पमतात असल्याचा दावा विरोधी पक्ष भाजपने केला होता. या आरोपांनतर मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी राजीनामा देत सरकार विसर्जित केलं. याच दरम्यान, पुदुच्चेरीच्या उपराज्यपाल डॉ. किरण बेदी यांनी अचानक राजीनामा देऊन पद रिक्त केलं. सध्या उपराज्यपलाचा भार तमिलसाई सुंदररंजन यांच्याकडे आहे.

    या वर्षी एप्रिल आणि मे महिन्यात पुदुच्चेरीच्या निवडणुका पार पडणार आहेत. काँग्रेस अल्पमतात असल्यामुळे त्यांनी पुन्हा सरकारस्थापनेचा दावा केलेला नाही. तर निवडणुकीच्या तोंडावर अल्प कालावधीसाठी सरकार स्थापन करण्यात भाजपलाही रस नाही. त्यामुळे या ठिकाणी सरकार स्थापनेसाठी सध्या कुणीच उत्सुक नसल्याचं चित्र आहे. आगामी निवडणुकीत आपण प्रचंड बहुमतानं निवडूून येऊ, असा दावा दोन्ही पक्षांनी केलाय. मात्र सध्या कुणीच सत्तास्थापनेसाठी उत्सुक नसल्यामुळे उपराज्यपालांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे.

    दरम्यान, अनैतिक आणि चुकीच्या मार्गानं आपलं सरकार पाडल्याचा दावा काँग्रेसनं केलाय. तर काँग्रेसमधून आमदारांनी राजीनामे दिल्यामुळे हे घडलं असल्याचं भाजपनं म्हटलंय. काँग्रेसला आपले आमदार सांभाळता येत नसतील तर त्यांनी आपल्यावर आरोप करू नयेत, असं भाजपनं म्हटलंय.