As soon as the result was announced Violence in Bengal; BJP office set on fire

विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यायनंतर ता प. बंगालमध्ये राजकीय हिसाचाराला सुरुवात झाली आहे. निकालाच्या दिवशीच कोलकातातील भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण करुन, त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. विरोधकांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याने गृह मंत्रालयाने बंगाल सरकारकडून याबाबतचा अहवाल मागविला आहे.

  कोलकाता : विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यायनंतर ता प. बंगालमध्ये राजकीय हिसाचाराला सुरुवात झाली आहे. निकालाच्या दिवशीच कोलकातातील भाजपाच्या कार्यालयाला आग लावण्यात आली होती. त्यानंतर सोमवारी भाजपाच्या दोन कार्यकर्त्यांना मारहाण करुन, त्यांची हत्या करण्यात आल्याची माहिती आहे. विरोधकांच्या कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात येत असल्याने गृह मंत्रालयाने बंगाल सरकारकडून याबाबतचा अहवाल मागविला आहे.

  निकालांनंतर गेल्या २४ तासात ९ कार्यकर्त्यांचा मृत्यू झाल्याचा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केला आहे. यामुळे राज्यात भीतीचे आणि तणावपूर्ण वातावरण असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. सत्ताधारी पक्ष याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत आहे, पोलीसही मदत करत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. या प्रकरणी राज्यपालांची भेट घेतली असून त्यांनी कारवाईचे आश्वासन दिल्याचेही घोष यांनी सांगितले आहे. विजयाचा जल्लोष करणाऱ्या काही जणांनी एका घरात घुसून तोडफोड केल्याचा व्हिडीओ भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबिता पात्रा यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

  भाजपा कार्यालयावर हल्ला

  उत्तर २४ परगणा जिल्ह्यात भाटपाडामध्ये भाजपाचे कार्यालय आणि काही दुकानांवर हल्ला करुन तोडफोड करण्यात आली. यावेळी काही बाँम्बही फेकण्यात आले. कूचबिहारी आणि सीतलकुची येथेही हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मंदीग्राममध्येही भाजपा कार्यालयावर हल्ला करण्यात आला, हल्दियामध्येही रविवारी संध्याकाळी काही समाजकंटकांनी पत्रकारांना मारहाण केली.

  राज्यपालांनी पोलिसांकडे मागितले उत्तर

  राज्यातील हिंसाचाराच्या घटनांची दखल राज्यपालांनी घेतली असून, त्यांनी पोलीस महासंचालक आणि कोलकात्याचे पोलीस आयुक्त यांना कायदा सुव्यवस्थेवर चर्चा करण्यासाठी पाचारण केले. निकालांनंतर राज्यात सुरु असलेला हिंसाचार आणि हत्या भयावह स्थितीचे संकेत आहेत. कायद्याचे राज्य येण्यासाठी सर्वोतोपरी उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील घटनांबाबत दु:ख व्यक्त करताना, त्यांनी राज्यातील जनतेला शांततेचे आवाहन केले आहे.

  तीन जागांवरील मतदान पुढे

  कोरोनामुळे उमेदवारांच्या झालेल्या मृत्युमुळे मुर्शिदाबादमधीलस दोन जागांवरील मतदान पुढे ढकलण्यात आले, त्याचबरोबर ओडिशातील एका जागेवरील मतदानही पुडे ढकलण्यात आले आहे. कोरोनाच्या स्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.