adar poonawala

कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही अँटीबॉडीज तयार न झाल्याची तक्रार एका व्यक्तीने सीरमविरोधात केला होती. या घटनेनंतर खळबळही उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने तक्रारकर्ते प्रतापचंद्र यांनी न्यायालयात धाव घेतली. आता कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली असून कलम 156-3 अंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक अदर पूनावाला, ड्रग्ज कन्ट्रोल डायरेक्टर, आयसीएमआर, आरोग्य सचिव आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

  लखनौ : कोविशील्ड लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरही अँटीबॉडीज तयार न झाल्याची तक्रार एका व्यक्तीने सीरमविरोधात केला होती. या घटनेनंतर खळबळही उडाली होती. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्याने तक्रारकर्ते प्रतापचंद्र यांनी न्यायालयात धाव घेतली. आता कोर्टाने या प्रकरणाची दखल घेतली असून कलम 156-3 अंतर्गत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मालक अदर पूनावाला, ड्रग्ज कन्ट्रोल डायरेक्टर, आयसीएमआर, आरोग्य सचिव आणि जागतिक आरोग्य संघटना (डब्ल्यूएचओ) विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

  8 एप्रिलला घेतला होता पहिला डस

  हे संपूर्ण प्रकरण लखनौमधील कँट पोलिस ठाणे परिसरातील आहे. येथील प्रतापचंद्र यांनी याबाबत तक्रार केली होती. 8 एप्रिल रोजी कोविशिल्डचा पहिला डोस घेतला होता. त्यानंतर दुसरा डोस 28 दिवसानंतर होता जो 6 आठवड्यांनंतर दिला जाईल असे सांगण्यात आले. तथापि, त्यानंतर सरकारने आता दुसरा डोस 6 नव्हे तर 12 आठवड्यांनंतर दिला जाईल, असे सांगितले.

  प्लेटलेट्सही घसरल्या

  दरम्यान, कोविशील्ड लसीच्या पहिल्या डोसनंतर शरीरात अँटीबॉडीज तयार होतात. हेच तपासण्यासाठी चंद्रप्रताप यांनी 21 मेरोजी सरकारमान्य लॅब थाररोकेअर मध्ये अँटीबॉडीची चाचणी केली. मात्र तो रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. याउलट शरीरातील प्लेटलेट्स 3 लाखांवरून 1.5 लाखांपर्यंत कमी झाल्या.त्यामुळे फक्त फसवलेच तर जीवालादेखील मोठा धोका निर्माण झाला असे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.

  हे सुद्धा वाचा