कोरोनानंतर लहान मुलांना ‘या’ रोगाचं संक्रमण, ४ जणांचा मृत्यू तर ३०० हून अधिक रूग्णांची नोंद

केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काल (शनिवार) पालकांना एमआयएस-सी लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्यास सांगितले. यावर उपचार घेतले जाऊ शकतात. जर तुम्ही या गोष्टीला दुर्लक्षीत केलात तर पुढील धोका अधिकपटीने वाढू शकतो. असं पिनराई विजयन यांनी सांगितलं आहे.

    केरळ : देशात कोेरोनाचं संक्रमण आता कमी प्रमाणात होताना दिसत आहे. परंतु केरळमध्ये कोरोनाचा पुन्हा एकदा विस्फोेट झाल्याचं समजलं जात आहे. केरळमध्ये कोरोनानंतर लहान मुलांना एमआयएस-सीचं संक्रमण होत असून मागील ५ महिन्यांमध्ये ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३०० हून अधिक रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. कोव्हिड-१९ मुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. एमआयएस-सीबाबत ( MIS-C ) राज्यासाठी नवनवीन सल्ले देण्यात येत आहेत. मागील दोन महिन्यांमध्ये कोरोनाचा धोेका तीव्र असून कायम आहे.

    केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी काल (शनिवार) पालकांना एमआयएस-सी लक्षणे मुलांमध्ये दिसल्यास त्वरित वैद्यकीय मदत घेण्यास सांगितले. यावर उपचार घेतले जाऊ शकतात. जर तुम्ही या गोष्टीला दुर्लक्षीत केलात तर पुढील धोका अधिकपटीने वाढू शकतो. असं पिनराई विजयन यांनी सांगितलं आहे.

    तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआयएस-सी हा कोव्हिड-१९ नंतरचा रोग आहे. या रोगामुळे मुलांना ताप येणे,पोेटात दुखणे, डोळे लाल होणे आणि कोरोनाव्हायरसमधून बरे झाल्यानंतर तीन-चार आठवड्यात मळमळ होणे, अशा प्रकारची लक्षणे आढळून येतात.

    आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १० टक्के लोकांना कोेरोनाचा संसर्ग झाला आहे. तर १८ वर्षाखालील अल्पवयीन मुलांमध्ये एमआयएस-सीची लक्षणे आढळून आली आहेत. एमआयएस-सीच्या पहिल्या रूग्णाची नोंद तिरुअनंतपुरममधील एसएटी या सरकारी रूग्णालयात मार्चमध्ये करण्यात आली होती. परंतु सार्वजनिक आरोग्य तज्ञ डॉ. पद्मनाभ शेणॉय यांनी सांगितलं की, मागील वर्षात कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ होण्याची नोंद करण्यात आली होता. परंतु गेल्या काही महिन्यांत कोरोनाच्या संख्येत पुन्हा एकदा भर होेताना दिसत आहे.