Power bank found on the street; Mobile charging is dead

मोबाईल फोन चार्ज करण्याच्या नादात एका 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे. हा तरुण रस्त्याने चालला असताना त्याला पॉवर बँकसदृश वस्तू रस्त्यावर पडलेली दिसली. त्याने ती फोनला कनेक्ट करताच त्याचा स्फोट झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    भोपाळ : मोबाईल फोन चार्ज करण्याच्या नादात एका 28 वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना मध्यप्रदेशात घडली आहे. हा तरुण रस्त्याने चालला असताना त्याला पॉवर बँकसदृश वस्तू रस्त्यावर पडलेली दिसली. त्याने ती फोनला कनेक्ट करताच त्याचा स्फोट झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

    मात्र, ही वस्तू काय होती याबद्दल अजूनही काही कळले नाही. चपरोड गावातही घटना घडली आहे. मृत राम साहिल पाल हा आपल्या शेताकडे चालला होता. त्यावेळी त्याला रस्त्यावर पॉवर बँकसारखी दिसणारी एक वस्तू सापडली. त्यानंतर काही वेळाने त्याने आपला मोबाईल फोन त्याला जोडला आणि त्यावेळी त्या वस्तूचा स्फोट होऊन राम साहिल पाल याचा जागीच मृत्यू झाला.