Precedence in Kashmir, Himachal Pradesh; Yellow alert in 14 districts of Bihar

    धर्मशाळा : हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळा येथे ढगफुटी झाली. या ढगफुटीचा थरारक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. मुसळधार पावसामुळे काश्मिर हिमाचल प्रदेशमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. बिहारच्या 14 जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

    अचानक ढगफुटी झाल्याने हिमाचल प्रदेशची राजधानी असलेल्या धर्मशाळामध्ये हाहाकार माजला. ढगफुटीमुळे या भागात पुरस्थिती निर्माण झाली आहे. यानंतर प्रशासनाने शहरी भागात हाय अलर्ट जारी केला आहे. पुराचं पाणी शहरातील घरांमध्ये घुसल आहे. पुरामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झाल आहे.

    या पुरात अनेक लग्जरी कार वाहून गेल्या आहेत. ढगफुटी इतकी भयानक होती, की त्यानंतर लगेचच पूर आला. पुराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. पुराने धर्मशाळेत हाहाकार माजवला, अनेक वाहनांना जलसमाधी मिळाली आहे.