हुंड्यासाठी दबाव म्हणजे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा तिचा जीवच घेण्याचे प्रकार भारतात वाढतच चालले आहे. लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला, गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत, चारित्र्याचा संशय, अशा असंख्य कारणावरून आजही भारतीय महिलांचा मानसिक आणि शा‌रीरिक छळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या छळाला कंटाळून अनेक महिला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, हुंड्यासाठी टाकलेला दबाव आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे नव्हे, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

    प्रयागराज : हुंड्यासाठी छळ करून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त करणे किंवा तिचा जीवच घेण्याचे प्रकार भारतात वाढतच चालले आहे. लग्नात मानपान दिला नाही, हुंडा कमी दिला, गाडी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणले नाहीत, चारित्र्याचा संशय, अशा असंख्य कारणावरून आजही भारतीय महिलांचा मानसिक आणि शा‌रीरिक छळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. या छळाला कंटाळून अनेक महिला आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. मात्र, हुंड्यासाठी टाकलेला दबाव आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे नव्हे, असा निर्णय अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.

    पुरावा असेल तरच आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप सिद्ध होऊ शकतो. हुंड्यासाठी दबाव आणणे म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे नाही, असे सांगतानाच, न्यायालयाने कलम 306 आयपीसी अंतर्गत दाखल आरोपपत्र रद्द केले. तसेच हुंडा छळाच्या कलमात खटला चालवण्याचे आदेश उच्च न्यायालयाने सीजेएम मेरठला दिले आहेत.

    मेरठच्या आनंदसिंह आणि इतरांच्या याचिकेवर न्यायमूर्ती पंकज भाटिया यांच्या एकल खंडपीठाने हा आदेश दिला आहे. याप्रकरणी आनंदसिंह आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरूद्ध मेरठच्या प्रतापपूर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल आहे. त्यांच्यावर आरोप आहे, की त्यांनी पीडित अनू आणि तिच्या कुटुंबावर लग्नासाठी दबाव आणला. ते भरमसाठ रकमेची मागणी करत होते, यामुळे लग्नाच्या 15 दिवस आधी अनुने स्वत: ला पेटवून घेतले. नंतर दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात तिचे निधन झाले. या याचिकेवर सुनावणी करताना, हुंड्यासाठी दबाव आणणे म्हणजे आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे नव्हे, असा निर्वाळा अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे.