PM face for INDIA bloc
PM face for INDIA bloc

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरूलिया येथे रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार निशाणा साधला.(prime minister narendra modi criticized mamata banerjee) ‘दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’, असे म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला.

    कोलकाता: पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुका(west Bengal election) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. सध्या पश्चिम बंगालमध्ये अनेक दिग्गज नेते रॅलीमध्ये सहभागी होताना दिसत आहे तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही सुरू आहेत. गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी(prime minister narendra modi criticized mamata banerjee) यांनी पुरूलिया येथे रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी ममता बॅनर्जी आणि पश्चिम बंगाल सरकारवर जोरदार निशाणा साधला.

    ‘दीदी बोले- खेला होबे, BJP बोले- विकास होबे’, असे म्हणत पंतप्रधानांनी ममता बॅनर्जींना टोला लगावला. यावेळी त्यांनी तृणमूल काँग्रेस (TMC) म्हणजे ट्रान्सफर माय कमिशन असल्याचे म्हणत निशाणा साधला. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस सरकारचे अवघे काही दिवसच शिल्लक आहेत. ममता बॅनर्जी यांना हे माहीत आहे म्हणून त्या ‘खेला होबे’ असे म्हणत आहेत. जर तुमचे ध्येय सेवा करणे असेल तर खेळले जात नाही. आता खेळ संपणार आणि विकास सुरू होणार, असेही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

    दीदी भारताच्या कन्या
    आमच्यासाठी दीदी या भारताच्या कन्या आहेत. जेव्हा त्यांना दुखापत झाली तेव्हा आम्हालाही चिंता झाली. त्यांच्या पायाची दुखापत लवकरच बरी होवो, असेही मोदी यावेळी म्हणाले. ते पुढे म्हणाले की, केंद्र सरकराने जेव्हा याठिकाणी स्वस्त दरातील तांदूळ पाठवले तेव्हा टीएमसीच्या काही लोकांनी त्यातही घोटाळा केला. भरती परीक्षांमध्येही टीएमसीने जे काही केले तेदेखील नीट केले जाणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

    वाघीण आहे…फक्त जनतेसमोर झुकणार
    दरम्यान मिदनापूर येथे रॅलीला संबोधित करताना पंतप्रधानांच्या आरोपांवर पलटवार करत ममतांनी ‘मी वाघीण आहे…मी माझे शीर कोणत्याही पक्षासमोर झुकवत नाही, फक्त जनतेसमोर झुकवते’ असे सांगितले. भाजपा महिला व दलितांवर अन्याय करीत असून मी यात त्यांना यशस्वी होऊ देणार नसल्याचेही दीदींनी सांगितले. त्यांनी भाजपावर मते विकत घेतल्याचाही आरोप लावला.