प. बंगाल दिदींचाच; पंतप्रधान मोदींनी केले ममता बॅनर्जींचे अभिनंदन

चार राज्य आणि एक केंद्रशासित राज्यात झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक उत्सुकता बंगालबाबत होती. भाजपाने बंगालमधील निवडणूक प्रतिष्ठेची ठरविली होती परंतु दीदींच्या दादागिरीपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे काहीच चालले नाही. या दोन्ही नेत्यांनी बंगाल पालथा घातल्यानंतरही त्यांच्या पदरी अपयशच आले. २२१ हून अधिक जागा जिंकत ममतांनी आपला गड पून्हा एकदा काबीज केला आहे. पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. ट्विट करत मोदींनी ममतांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्र पश्चिम बंगालच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करत राहील असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

    कोलकाता : चार राज्य आणि एक केंद्रशासित राज्यात झालेल्या निवडणुकीत सर्वाधिक उत्सुकता बंगालबाबत होती. भाजपाने बंगालमधील निवडणूक प्रतिष्ठेची ठरविली होती परंतु दीदींच्या दादागिरीपुढे पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून केंद्रीय गृहमंत्री शाह यांचे काहीच चालले नाही. या दोन्ही नेत्यांनी बंगाल पालथा घातल्यानंतरही त्यांच्या पदरी अपयशच आले. २२१ हून अधिक जागा जिंकत ममतांनी आपला गड पून्हा एकदा काबीज केला आहे. पश्चिम बंगालमधील टीएमसीच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे.

    ट्विट करत मोदींनी ममतांना विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्र पश्चिम बंगालच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करत राहील असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.

    दरम्यान, नंदीग्राममध्ये तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आणि भाजपचे शुभेन्दु अधिकारी यांच्यात अटीतटीची लढत झाली. शेवटपर्यंत रोमांचक ठरलेल्या या लढतीत ममता बॅनर्जी यांचा १९५३ मतांनी पराभव झाला आहे. मात्र आधी ममता बॅनर्जी यांचा विजय झाला असल्याची माहिती समोर आली होती. याबाबत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काहीतरी छेडछाड करण्यात आल्याची माहिती माझ्याकडे असून याविरोधात कोर्टात जाणार आहे. मी सत्य समोर आणणार आहे, असे बॅनर्जी म्हणाल्या. दरम्यान नंदीग्रामध्ये फेर मतमोजणीची मागणी ममतांनी केली आहे.