Prime Minister Modi forgets Maharashtra; 1000 crore aid to Gujarat

चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरातची हवाई पाहणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी आज केवळ गुजरातचा दौरा केला. पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातला तातडीच्या मदतीसाठी 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्र, गोव्याल्या देखील चक्रीवादळाचा फटका बसला आहे. पंतप्रधानांनी गुजरात व दीव या भागातील ऊना, जाफराबाद, महुआची हवाई पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मदत तसेच पुनर्वसनाबात करण्यात आलेल्या उपायोजनांवर चर्चाही केली.

    अहमदाबाद : चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या गुजरातची हवाई पाहणी करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झालेल्या नुकसानाचा आढावा घेतला. पंतप्रधानांनी आज केवळ गुजरातचा दौरा केला. पाहणीनंतर पंतप्रधान मोदींनी गुजरातला तातडीच्या मदतीसाठी 1 हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. गुजरातप्रमाणे महाराष्ट्र, गोव्याल्या देखील चक्रीवादळाचा फटका बसला आहे. पंतप्रधानांनी गुजरात व दीव या भागातील ऊना, जाफराबाद, महुआची हवाई पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी मदत तसेच पुनर्वसनाबात करण्यात आलेल्या उपायोजनांवर चर्चाही केली.

    कुटुंबीयांनाही मदत जाहीर

    पंतप्रधानांनी केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, दमन व दीव, दादरा आणि नागर हवेलीत चक्रीवादळात प्राण गमावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबाना 2 लाख रुपयांची मदत करण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी केली. तर जखमींना 50 हजार रुपये देण्यात येणार आहे. तोक्ते चक्रीवादळामुळे गुजरातमध्ये आतापर्यंत 45 जणांचा तर महाराष्ट्रात 6 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.

    केंद्रीय पथक करणार दौरा

    दरम्यान, केंद्र सरकारचे मंत्रिमंडळस्तरीय पथकही गुजरातचा दौरा करणार आहेत. हे पथक झालेल्या नुकसानाचा आढावा घेणार आहे आणि अहवालही सादर करणार आहे. या अहवालाच्या आधारावर गुजरात सरकारला आर्थिक मदतही केली जाणार आहे.