युपीत कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठीचे नियम बदला, प्रियंका गांधींचं योगी सरकारला आवाहन, सीएमओच्या परवानगीची अट काढून टाकण्याची मागणी

उत्तर प्रदेशमध्ये रुग्णांना कोरोनावरील उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी सीएमओ म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय. कोरोनाच्या लाटेत रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असून पेशंटला दाखल करताना त्याच्या कुटुंबीयांना या नियमामुळे नाहक धावपळ करावी लागत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तातडीने पावलं उचलणं गरजेचं असताना सीएमओच्या परवानगीच्या अटीमुळे अनेक रुग्णांना प्राण गमावावे लागत असल्याची टीका प्रियंका गांधींनी केलीय.

    देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलंय. देशातल्या जवळपास सर्व राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चाललीय. अशा परिस्थितीत उत्तर प्रदेशमध्ये कोरोनाबाधितांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी घालण्यात आलेले नियम जाचक आणि अव्यवहार्य असल्याची टीका काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केलीय.

    उत्तर प्रदेशमध्ये रुग्णांना कोरोनावरील उपचारासाठी दाखल करण्यापूर्वी सीएमओ म्हणजेच मुख्यमंत्री कार्यालयाची परवानगी घेणं बंधनकारक करण्यात आलंय. कोरोनाच्या लाटेत रुग्णसंख्येत झपाट्यानं वाढ होत असून पेशंटला दाखल करताना त्याच्या कुटुंबीयांना या नियमामुळे नाहक धावपळ करावी लागत आहे. रुग्णांचा जीव वाचवण्यासाठी तातडीने पावलं उचलणं गरजेचं असताना सीएमओच्या परवानगीच्या अटीमुळे अनेक रुग्णांना प्राण गमावावे लागत असल्याची टीका प्रियंका गांधींनी केलीय.

    प्रियंका गांधींनी लिहिलेल्या पत्रात म्हटलंय की कोरोना रुग्णांइतकचे त्यांचे नातेवाईकही आता दुःखात आहेत. लालफितशाहीमुळे त्यांचा वैताग आता अधिकच वाढलाय. प्रत्येक जीव तितकाच महत्त्वाचा आहे, हे गृहित धरून उत्तर प्रदेश सरकारनं आपली व्यवस्था तयार करायला हवी. त्याचप्रमाणं हॉस्पिटल्स आणि उपलब्ध बेड्स यांची आकडेवारी जाहीर करावी, असंही त्यांनी म्हटलंय.

    ऑक्सिजन पुरवठ्याबाबतही लालफितशाही सुरू असून डीएमच्या परवानगीविना रुग्णांना ऑक्सिजनदेखील मिळत नसल्याचं चित्र आहे. यावर तातडीनं उपाय करून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गरज असल्याचं मत प्रियंका गांधींनी व्यक्त केलंय.