पायलट यांना प्रियांका गांधींचा रात्री उशिरा फोन, राजस्थानमध्ये राजकीय हालचालींना वेग

चिन पायलट गटातून राजीनामा देणारे आमदार हेमाराम चौधरी रात्री उशिरा जयपूरला पोहोचले आहेत. ते आज सभापती सीपी जोशी यांची भेट घेतील. वैयक्तिक बैठक घेतल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय घेण्यात येईल, असं विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले.

    राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट सामंजस्य समितीच्या अहवालावर नाराज आहेत. पायलट यांची समजूत काढण्याचा प्रयत्न कॉंग्रेस हाय कमांडने केला आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यासह कॉंग्रेसच्या सर्व बड्या नेत्यांनी रात्री उशिरा सचिन पायलट यांना फोन करून त्यांची समजूत काढत यावर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.

    आज यासंदर्भात सचिन पायलट दिल्लीला जाणार आहेत. दरम्यान, आज अचानक सचिन पायलट पहाटे दौसा येथे पोहोचले आहेत. या ठिकाणी पायलट यांनी दिवंगत वडील राजेश पायलट यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत सहा आमदार होते.

    यादरम्यान, सचिन पायलट गटातून राजीनामा देणारे आमदार हेमाराम चौधरी रात्री उशिरा जयपूरला पोहोचले आहेत. ते आज सभापती सीपी जोशी यांची भेट घेतील. वैयक्तिक बैठक घेतल्यानंतरच राजीनाम्याचा निर्णय घेण्यात येईल, असं विधानसभेचे अध्यक्ष सीपी जोशी म्हणाले.

    जितिन प्रसाद यांनी कॉंग्रेस सोडली. नवजोतसिंग सिद्धू आणि सचिन पायलट नाराज आहेत. कॉंग्रेसमध्ये विचारमंथन व चिंतन सुरू आहे. सध्या, सचिन पायलट यांनी मौन धारण केलं आहे, परंतु याचं कारण असंतोष आहे.