beating with belt

राजस्थानमधील बारमेरमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना (engineering students) प्राध्यापकांनी बेल्टने मारल्याची घटना उघड झाली आहे. प्राध्यापकाने या विद्यार्थांना मारहाण (engineering students beaten by professor)करुन हॉस्टेलमधूनही काढून टाकले.

    बारमेर : राजस्थानमधील बारमेरमध्ये एक विचित्र प्रकार समोर आला आहे. इथल्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना (engineering students) प्राध्यापकांनी बेल्टने मारल्याची घटना उघड झाली आहे. प्राध्यापकाने या विद्यार्थांना मारहाण करुन हॉस्टेलमधूनही काढून टाकले.

    बारमेर (Barmer) येथील इंजिनीअरिंग कॉलेजमधील योगेंद्र सिंह, सुखदेव पवार, श्यामवीर, ऋषभ सोनी, आणि प्रियांश अशी या पाच विद्यार्थ्यांना प्राध्यापकांनी मारहाण केली. हे ५ जण पेट्रोलियम इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.  या विद्यार्थ्यांवर चोरीचा आरोप करत कॉलेजमधील प्राध्यापक देव सिंह, भंवर स्वामी आणि सबरजिस्टार भैरु सिंह चौहान यांनी त्यांना मारहाण केली आणि जीव घेण्याची धमकी दिली असा आरोप आहे.

    या प्रकरणातील एका पीडित विद्यार्थ्याने आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या प्रकरणाला ४ दिवस झाले तरी याविषयी पोलिसांकडे तक्रार करण्यात आलेली नाही. अज्ञात व्यक्तीने या मारहाणीची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना दिल्यावर पालकांनी हॉस्टेलमध्ये जाऊन मुलांची भेट घेतली. मात्र कुणीही या प्रकरणात पोलिसांकडे तक्रार करायला गेेले नाही. कॉलेज व्यवस्थापनानेही प्राध्यापकांवर कोणतीही कारवाई केली नाही. उलट विद्यार्थांना हॉस्टेलमधून काढून टाकलं.

    कोणतेही वाईट कृत्य केलेले नसताना बेल्ट आणि काठीने मारहाण झाल्याचे स्पष्टीकरण विद्यार्थ्यांनी दिले आहे.