Punishment to the student for not completing homework ... Boiling oil clicks on the hands

ट्युशनमधल्या शिक्षिकेने दिलेला होमवर्क केला नाही, म्हणून चिमुरडीच्या हाताला उकळत्या तेलाचे चटके दिले. यावेळी उकळत्या तेलाचे शिंतोडे चिमुरडीच्या चेहऱ्यावरही पडले, त्यामुळे तिचा चेहराही भाजला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

गोरखपूर  : एका शिक्षीकेनी हैवानी कृत्य केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये घडली आहे. होमवर्क पूर्ण केला नाही म्हणून एका कोचींग क्लासच्या शिक्षीकेने चिमुरडीच्या हातावर उकळत्या तेलाचे चटके दिले आहेत. शिक्षीकेच्या या आघोरी कृत्या नंतर या मुलीच्या पालकांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.

सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्यातरी मुलांचे शैक्षमिक नुकसान होवू नये म्हणून अनेक पालक आपल्या मुलांना खाजगी शिकवणीला पाठवत आहेत. गोरखपूरमधल्या बाजारा भागातल्या एका कुटुंबाने त्यांच्या सात वर्षांची मुलगी शेजारच्याच घरी ट्यूशनला जात असे. यावेळी या विद्यार्थीसह हा धक्कादायक प्रकार घडला.

ट्युशनमधल्या शिक्षिकेने दिलेला होमवर्क केला नाही, म्हणून चिमुरडीच्या हाताला उकळत्या तेलाचे चटके दिले. यावेळी उकळत्या तेलाचे शिंतोडे चिमुरडीच्या चेहऱ्यावरही पडले, त्यामुळे तिचा चेहराही भाजला असा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला. या कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार या प्रकरणातील आरोपी शिक्षिका देखील अल्पवयीन आहे. यामुळे पोलिस अत्यंत काळजीपूर्वक याचा तपास करत आहेत.