हत्तीच्या धडकेने रेल्वेला अपघात, मध्यरात्री धक्का बसल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ

पुरी-सूरत एक्सप्रेसनं हथीबारी स्टेशन सोडल्यानंतर ती मनेसवार स्टेशनकडे चालली होती. रात्रीचे दोन वाजले होते. रेल्वेतील जवळपास सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. त्याचवेळी ट्रॅकवर एक हत्ती उभा असल्याचं मोटरमनच्या लक्षात आलं. त्यानंतर इमर्जन्सी ब्रेक दाबून अपघात टाळण्याचा आणि हत्तीलाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्तीची धडक इतकी जोरदार होती की रेल्वेच रुळावरून घसरली.

कधी, कुठे आणि कुठल्या कारणामुळे अपघात होईल, ह सांगता येत नाही. ओडिशात असाच एक विचित्र अपघात घडला. या अपघाताला कारणीभूत ठरला एक हत्ती.

ओडिशात ट्रॅकवर हत्ती आल्यामुळे रेल्वेचा अपघात झालाय. पुरी-सूरत एक्सप्रेस भरधाव वेगात चालली असताना अचानक एक हत्ती रेल्वे ट्रॅकवर आला. त्याला रेल्वेची धडक बसल्यामुळे रेल्वे रुळावरून घसरली आणि अपघात झाला.

पुरी-सूरत एक्सप्रेसनं हथीबारी स्टेशन सोडल्यानंतर ती मनेसवार स्टेशनकडे चालली होती. रात्रीचे दोन वाजले होते. रेल्वेतील जवळपास सर्व प्रवासी गाढ झोपेत होते. त्याचवेळी ट्रॅकवर एक हत्ती उभा असल्याचं मोटरमनच्या लक्षात आलं. त्यानंतर इमर्जन्सी ब्रेक दाबून अपघात टाळण्याचा आणि हत्तीलाही वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र हत्तीची धडक इतकी जोरदार होती की रेल्वेच रुळावरून घसरली.

या धडकेमुळे रेल्वेचं इंजिन रुळावरून घसरलं आणि इंजिनाची सहा चाकं रुळाच्या खाली ढकलली गेली. या अपघातात कुठलीही जिवीत हानी झालेली नाही. एकही प्रवासी जखमी झालेला नाही.

मात्र मध्यरात्री गाढ झोपेत असताना अचानक घडलेल्या या घटनेमुळे प्रवाशांमध्ये काही काळ संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं.