पुष्कर सिंह धामी यांनी घेतली उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ ; मंत्रिमंडळात ज्येष्ठ नेत्यांचाही समावेश

आज संध्याकाळी राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात पुष्कर सिंह धामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यांच्याबरोबर सतपाल महाराज, धन सिंह रावत, विशन सिंह चुफल, मदन कौशिक, गणेश जोशी, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, रेखा आर्या, बंशीधर भगत आदी नेतेही शपथ घेण्यासाठी राजभवनात पोहोचले होते.

    डेहराडून: पुष्कर सिंह धामी यांनी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राजभवनात धामी यांना पद आणि गोपनीयतेची आज शपथ घेतली आहे. त्यांच्यासोबत  ज्येष्ठ नेत्यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली आहे.

    आज संध्याकाळी राजभवनात छोटेखानी कार्यक्रमात पुष्कर सिंह धामी यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. त्यांच्याबरोबर सतपाल महाराज, धन सिंह रावत, विशन सिंह चुफल, मदन कौशिक, गणेश जोशी, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, रेखा आर्या, बंशीधर भगत आदी नेतेही शपथ घेण्यासाठी राजभवनात पोहोचले होते.

    कोण आहेत पुष्करसिंह धामी?

    पुष्करसिंह धामी हे उत्तराखंडमध्ये भाजपच्या युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्षही होते. 2002 ते 2008 पर्यंत त्यांनी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. धामी यांचा जन्म टुंडी, पिथौरागड येथे झाला होता. त्यांनी पदव्युत्तर पदवी आणि वकिलीचं शिक्षण घेतलं आहे. त्यांना तीन बहिणी आहेत. त्यांचे वडील माजी सैनिक होते. उत्तराखंडमधील खटीमा विधानसभा मतदारसंघातून ते दोनदा विजयी झाले आहेत.