प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो

कोरोनाच्या माहामारीने सगळ्यांनाच न्यू नॉर्मलच्या साच्यात बंद केले आहे. कोरोना माहामारी आणि लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा परिणाम समारंभांवर दिसून आला. खासकरून अनेक घरांमध्ये लोकांनी साध्या पद्धतीने, शासनाच्या नियमांचे पालन करत लग्न उरकले. सध्या डिजिटल व्यवहार करण्याकडे कल वाढला असून अनेकजण ऑनलाईन पेमेंट करताना दिसतात. तामिळनाडूच्या मदुराईमधील एका कुटुंबाने लग्न पत्रिकेवर गुगल पे आणि फोन पे चे क्यूआर कोड छापले आहेत. जेणेकरून जे लोक लग्नाला येऊ शकणार नाहीत. ते ऑनलाईन क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसै पाठवू शकतात.

मदुराई (Madurai). कोरोनाच्या माहामारीने सगळ्यांनाच न्यू नॉर्मलच्या साच्यात बंद केले आहे. कोरोना माहामारी आणि लॉकडाऊनचा सगळ्यात मोठा परिणाम समारंभांवर दिसून आला. खासकरून अनेक घरांमध्ये लोकांनी साध्या पद्धतीने, शासनाच्या नियमांचे पालन करत लग्न उरकले. सध्या डिजिटल व्यवहार करण्याकडे कल वाढला असून अनेकजण ऑनलाईन पेमेंट करताना दिसतात. तामिळनाडूच्या मदुराईमधील एका कुटुंबाने लग्न पत्रिकेवर गुगल पे आणि फोन पे चे क्यूआर कोड छापले आहेत. जेणेकरून जे लोक लग्नाला येऊ शकणार नाहीत. ते ऑनलाईन क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसै पाठवू शकतात.

असे आहे प्रकरण…
शिवशंकरी आणि सरवनन यांनी कोरोना प्रसाराचा धोका लक्षात घेता आपल्या मित्र मैत्रिणींसाठी आणि नातेवाईकांसाठी लग्नपत्रिकेवर क्यूआर कोड लावण्याची संकल्पना राबवली. जवळपास ३० लोकांनी याचा वापर करत नवरा वरींपर्यंत आपले आहेर पोहोचवले. हे लग्न रविवारी पार पडले असून सध्या या लग्नपत्रिकेचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. अनेकांनी या कल्पनेचे भरभरून कौतुक केले आहे. ही पत्रिका पाहिल्यानंतर नवरा-नवरीला आपल्या मित्रमैत्रिणींचे फोन यायला सुरुवात झाली. दरम्यान, गेल्या महिन्यातही केरळमधील एक लग्न सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते. या मंडळीने लग्नाचे जेवण आपल्या नातेवाईकांना घरपोच पुरविले होते. यासाठी त्यांनी चार रंगबिरंगी बॅग्स आणि केळीची पाने पाठविली होती.