Quarantine was done on the tree itself; Not one or two, but 11 days on the tree

देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल झाली असून, आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच क्वारंटाइन राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, बेसिक सुविधांचा अभाव असल्याने तसेच घर लहान असल्यामुळे नागरीकांना घरात विलगीकरणात राहणे अशक्य होत आहे. घरात विलगीकरणासाठी जागा नसल्याने एका तरुणाने एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले आहेत.

    हैद्राबाद : देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. सर्व रुग्णालये हाऊसफुल झाली असून, आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना घरीच क्वारंटाइन राहून उपचार घेण्याचा सल्ला दिला जात आहे. मात्र, बेसिक सुविधांचा अभाव असल्याने तसेच घर लहान असल्यामुळे नागरीकांना घरात विलगीकरणात राहणे अशक्य होत आहे. घरात विलगीकरणासाठी जागा नसल्याने एका तरुणाने एक दोन नाही तर तब्बल ११ दिवस झाडावर काढले आहेत.

    नालगोंडा जिल्ह्यात हा प्रकार घडला आहे. शिवा असे या 18 वर्षीय तरुणाचे नाव आहे. शिवाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता. डॉक्टरांनी त्याला घरातच विलगीकरणात राहून उपचार घेण्यास सांगितले. तो पॉझिटिव्ह असल्याची माहिती सरपंचानाही होती. त्यांनी शिवाला मदत केली नाही. शिवा पॉझिटिव्ह असल्याने आजूबाजूचे घराबाहेर पाऊल काढायलाही घाबरत होते.
    घरात जागा नसल्याने क्वारंटाइन रहाययचे कसे असा प्रश्न शिवाला पडला. शिवाने झाडावरच स्वतःसाठी कोविड वार्ड तयार केला. बांबूच्या काड्यांच्या मदतीने त्याने झाडावर राहता आणि झोपता येईल अशा प्रकारची मचान तयार केली. या मचानावर त्याने तब्बल ११ दिवस काढले.