‘ये हे आज का हिंदुस्थान’, धक्काबुक्कीच्या वेळी राहुल गांधींची उद्विग्न प्रतिक्रिया…

हाथरस (Hathras) पीडितेच्या भेटीसाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) , प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उ. प्रदेश पोलिसांनी (UP Police) रोखले. यावेळी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. यावेळी राहुल गांधी वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

 उ. प्रदेश : हाथरस (Hathras) पीडितेच्या भेटीसाठी निघालेले काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) , प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांना उ. प्रदेश पोलिसांनी (UP Police) रोखले. यावेळी राहुल आणि प्रियंका गांधी यांच्यासोबत असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीमार करण्यात आला. यावेळी राहुल गांधी वृत्तवाहिनींच्या प्रतिनिधींशी बोलत होते. याचवेळी राहुल गांधी यांनी यांनी ‘ये हे आज का हिंदुस्थान’, ‘मै दिखाता हू, ये हे नया हिंदूस्थान’ असे सांगत असतानाच त्यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली, एवढेच नाही तर यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने राहुल गांधी यांची कॉलर धरण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत राहुल गांधी रस्त्यावर पडले.

तरीही पोलिसांची दंडेलशाही सुरुच होती. यानंतर प्रियंका गांधी या ठिकाणी पोहचल्या. यानंतर या दोन्ही नेत्यांतं चर्चा झाली. काहीही झाले तरी हाथरस पीडितेच्या भेटीसाठी जाण्याबाबत ठाम भूमिका घेतली. जमावबंदी असेल तर एकटे जाण्यास कुणाचीच हरकत नाही, अशी भूमिकाही राहुल यांनी घेतली. त्यानंतर पोलिसांनी राहुल गांधी यांना अटक करण्यात आली. यावेळीही तुम्ही कोणत्या कायद्यानुसार अटक करताय, अशी विचारणा राहुल यांनी पोलिसांकडे केली होती. मात्र जमावबंदी उल्लंघनाचे कारण देत त्यांना अटक करण्यात आली.