फेसबुकवर मैत्री करून २.५ कोटीचा गंडा घालणाऱ्या भामट्याच्या राजस्थान पोलिसांनी आवळल्या मुसक्या

राजस्थानमधील जयपूरमध्ये एका परदेशी महिला बनत फेसबुकवर मैत्री करून अडीच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिहारममधील एका भामट्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव नीरज सुरी असे असून तो बिहारचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने रेबेका क्रिस्टीन नावाची परदेशी महिला असल्याचे भासवून फेसबुकवर महिलेची फसवणूक केली.

    जयपूर: सोशल मीडियाच्या माध्यमातून फसवणूक केल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत असतात. मात्र तरीही फसवणुकीची घटना घडत आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये एका परदेशी महिला बनत फेसबुकवर मैत्री करून अडीच कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या बिहारममधील एका भामट्याला राजस्थान पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव नीरज सुरी असे असून तो बिहारचा रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याने रेबेका क्रिस्टीन नावाची परदेशी महिला असल्याचे भासवून फेसबुकवर महिलेची फसवणूक केली. रेबेका सवाई माधोपूर येथील रहिवासी गुंजन शर्माची मैत्रीण झाली होती आणि तिला सांगितले की ती एक विधवा व कर्करोगी असून तिच्याकडे २८ कोटींची संपत्ती आहे.

    अशी केली फसवणूक

    आरोपीने रेबेका सवाई नावाने मालमत्तेला वारस नसल्यामुळे तिला ती गुंजनकडे हस्तांतरित करायची आहे, असे पीडित मुलीला सांगितले. या मालमत्तेसाठी तिचा वकील बार्मेक्स आणि भारतीय प्रतिनिधी बेन जॉन्सन तिला पुढील कामकाजासाठी संपर्क करतील. त्यानंतर, गुंजन यांना परकीय विनिमय विभागाचा ईमेल आला, त्यानंतर रिझर्व्ह बँकेकडून शुल्क आकारल्या जाणार्‍या कस्टम कार्यालयांद्वारे जप्त करण्यात आलेल्या महागड्या भेटींवर आकारण्यात आलेल्या दंडाच्या नावावर तिने शेअर केलेल्या विविध खात्यांतून अडीच कोटी रुपये दिले. प्रक्रिया शुल्क, वकील खर्च , इत्यादी विविध विभागांत विभागले गेले.

    पोलिसांची तक्रार

    फसवणूक झाल्याचे सामोर आल्यानंतर गुंजन यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस उपमहानिरीक्षक एसओजी शरत कविराज यांनी त्यांच्या पथकासह खात्याच्या आधारे पत्ते शोधून काढले आणि आरोपीला मसूरी आणि देहरादून येथील कार्यरत कार्यालयाकडून अटक केली. चौकशीत असे आढळले की आरोपी बनावट सीए कार्डचा व्यवहार करीत होता आणि त्याने जीएसटी, आयटीआर, पॅनकार्ड, आधार कार्डचा तपशील वापरुन बनावट खाती उघडण्यासाठी दिल्ली, मसूरी आणि देहरादून येथे कार्यालये उघडली.