rajnikant

तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीत रजनीकांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) साथ देतील, असे तामिळनाडूचे भाजपाचे प्रभारी आणि राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी यांनी म्हटले. काही आठवड्यांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली होती. ३१ डिसेंबरला पक्षाची स्थापना करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. मात्र, प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी हा निर्णय मंगळवारी मागे घेतला.

चेन्नई : दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यांनी यातून यूटर्न घेत राजकारणात उतरणार नसल्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्यांच्या या निर्णयानंतर भाजपाला अजूनही त्यांची साथ मिळण्याची आस कायम असल्याचे दिसते.

तामिळनाडूमधील आगामी विधानसभा निवडणुकीत रजनीकांत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) साथ देतील, असे तामिळनाडूचे भाजपाचे प्रभारी आणि राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी यांनी म्हटले.

काही आठवड्यांपूर्वीच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकीय पक्ष काढण्याची घोषणा केली होती. ३१ डिसेंबरला पक्षाची स्थापना करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते परंतु प्रकृती अस्वस्थ्यामुळे त्यांनी हा निर्णय मंगळवारी मागे घेतला.

राजकीय पक्ष काढण्याची बदललेली भूमिका ही रजनीकांत यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. या निर्णयानंतर आगामी निवडणुकीत ते एनडीएला पाठिंबा देतील, असा विश्वास सी. टी. रवी यांनी व्यक्त केला आहे.

रजनीकांतजी स्वत: राजकीय पक्ष काढणार नाहीत, हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. परंतु देश आणि तामिळनाडू राज्याच्या विकासात योगदान देण्यासाठी ते एनडीएला नक्की पाठिंबा देतील, असे ते म्हणाले.