Rajinikanth reversed his decision to enter politics why nrvb
रजनीकांतचे “नो पॉलिटिक्स? का?

सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणाला कायमचा रामराम केल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांचा रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भविष्यात राजकारणात येण्याची कोणतीच योजना नसल्याचेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

    चेन्नई : सुपरस्टार रजनीकांत यांनी राजकारणाला कायमचा रामराम केल्याची माहिती दिली आहे. त्याचबरोबर त्यांचा रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. भविष्यात राजकारणात येण्याची कोणतीच योजना नसल्याचेही रजनीकांत यांनी स्पष्ट केले आहे. रजनी मक्कल मंद्रम पक्ष विसर्जित करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला असून हा निर्णय फोरमच्या सदस्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी तमिळनाडू विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरच त्यांनी राजकारणात प्रवेश करणार नसल्याची घोषणा केली होती. प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजकारणात प्रवेश करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते.

    वेळच अशी आली की…

    दरम्यान, मी एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा आणि राजकारणात सक्रिय होण्याच विचार केला होता. परंतु वेळ अशी होती की हे शक्य झाले नाही, असे मत रजनीकांत यांनी ट्विटरवरून पोस्ट केलेल्या निवेदनात व्यक्त केले आहे. रजनीकांत हे गेल्या आठवड्यात अमेरिकेहून परतले. त्यानंतर त्यांनी पक्षाच्या सदस्यांशी चेन्नईत सोमवारी सकाळी भेट घेतली. या बैठकीत त्यांनी पक्ष विसर्जित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

    भविष्यात राजकारणात येण्याची माझी कोणतीच योजना नाही. रजनी मक्कल मंद्रम हा पक्ष विसर्जित होईल आणि त्याचे ‘रजनीकांत रासिगर नारपानी मंद्रम’ किंवा ‘रजनीकांत फॅन्स वेलफेअर फोरम’मध्ये रुपांतर करण्यात येईल.

    - रजनीकांत, अभिनेता