गुन्हेगारांचे राम-नाम सत्य करा – मुख्यमंत्री योगींचे पोलिसांना आदेश

आम्ही पोलिसांना आदेश दिले आहेत की ज्यावेळी शेतकरी बांधवांची भेट होईल तेव्हा त्यांच्याशी बोलताना राम राम म्हटले पाहिजे तर बहिणी-मुलींवर अत्याचार करणाऱ्या, सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचे राम नाम सत्य झाले पाहिजे.

लखनौ:  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यामध्ये राम राम आणि राम नाम सत्यचे वक्तव्य त्यांनी केले आहे.  बहिणी-मुलींवर अत्याचार करणाऱ्या, सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या गुन्हेगारांचे राम नाम सत्य झाले पाहिजे. दरम्यान, मंत्री आणि खासदारांचे वेतन थांबेल पण शेतकऱ्यांसाठी सुरु केलेला शेतकरी सन्मान निधी थांबणार नाही असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितले.

भारताच्या एकतेला आव्हान दिले जातेय्
मेरठ इथं झालेल्या रॅलीत योगी म्हणाले की, शेतकरी बांधवांच्या खांद्यावर बंदूक ठेवून भारताच्या एकतेला आव्हान दिले जात आहे. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करण्याचे काम केले जात आहे आणि हे कधीच सहन केलं जाणार नाही. कोणताही प्रश्न हा संवादाने सुटेल, संघर्षाने नाही असे योगी आदित्यनाथ म्हणाले.