आता महाविद्यालयात शिकवणार रामायण, महाभारत; शिक्षणमंत्र्यांनी केली मोठी घोषणा

भारतीय समाज जीवनावर रामायण आणि महाभारताचा खुप प्रभाव आहे. पुरातन काळातील या कथांनी भारतीय समाज व्यवस्था बांधण्याचं काम केलं आहे. आजही भारतात रामायण आणी महाभारत या गोष्टींवरून वाद होताना पहायला मिळतात. दरम्यान यातच आता मध्य प्रदेश सरकारने रामायण आणि महाभारताबद्दल मोठी घोषणा केली आहे.

    नवी दिल्ली : भारतीय समाज जीवनावर रामायण आणि महाभारताचा खुप प्रभाव आहे. पुरातन काळातील या कथांनी भारतीय समाज व्यवस्था बांधण्याचं काम केलं आहे. आजही भारतात रामायण आणी महाभारत या गोष्टींवरून वाद होताना पहायला मिळतात.

    दरम्यान यातच आता मध्य प्रदेश सरकारने रामायण आणि महाभारताबद्दल मोठी घोषणा केली आहे. प्रभू राम हे देशातील सर्वांचं प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे योगदान हे युवा पिढीला कळणे गरजेचे आहे. म्हणून रामायण आणि महाभारत या पुण्यकथांचा समावेश आम्ही अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात आहोत, अशी घोषणा मध्य प्रदेशचे उच्च आणि तंत्रज्ञान शिक्षण मंत्री मोहन यादव यांनी केली आहे.

    मोहन यादव नेमकं काय म्हणाले?

    रामचरित्र मानस हा विषय स्वरूपात उच्च शिक्षणात शिकवला जाणार आहे. राज्यातील तरूणांना या शिक्षणाच्या माध्यमातून प्रभू रामांचं महत्त्व कळायला मदत होईल. तसेच महाभारताच्या समावेशाने तरूणांना आदर्श बनायला मदत होणार आहे, असंही मोहन यादव म्हणाले.

    दरम्यान, मध्य प्रदेश सरकारने उच्च आणि तंत्रशिक्षण अभ्यासक्रमात बदल करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. रामायण, महाभारत आणि रामचरित्र मानस यांच्या समावेशाने उच्च शिक्षण घेणाऱ्या तरुणांना भारतीय संस्कृतीची समज यायला मदत होणार आहे.