रामदेव बाबांच्या ‘कोरोनील’ची जागतिक स्तरावर दखल; इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध करत केला खळबळजनक दावा

योगगुरू रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाला हिरवा कंदील दाखवण्यात आला असून जागतिक स्तरावर त्याची दखल घेण्यात आली आहे. औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मात्र, बाबा रामदेवच्या कोरोनील या औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. यामुळे पतंजलीचे ‘कोरोनील’ औषध पून्हा वादात सापडले आहे.

    दिल्ली : योगगुरू रामदेव बाबांच्या कोरोनील औषधाला हिरवा कंदील दाखवण्यात आला असून जागतिक स्तरावर त्याची दखल घेण्यात आली आहे. औषधाला जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मात्र, बाबा रामदेवच्या कोरोनील या औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशनने विरोध केला आहे. यामुळे पतंजलीचे ‘कोरोनील’ औषध पून्हा वादात सापडले आहे.

    इंडियन मेडिकल असोसिएशनने कोरोनीलला डब्ल्युएचओने मान्यता दिलीच नसल्याचा दावा केला आहे. ट्विटचा हवाला देत मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाच्या कोड ऑफ कंडक्टचं उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

    केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन हे पतंजलीला चुकीच्या पद्धतीने प्रमोट करत असल्याचा आरोप केला जात आहे. बाबा रामदेव, केंद्रिय आरोग्य मंत्री यांनी डीसीजीआय आणि डब्ल्युएचओने कोरोनीलली मान्यता दिल्याचं स्पष्ट केलं होते.

    कोरोनील औषधावरून वादंग निर्माण झाले होते. मात्र, आता या औषधास ‘सर्टिफिकेशन ऑफ फार्मास्युटिकल प्रोडक्ट-डब्ल्यूएचओ गुड्स मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिस’चे प्रमाणपत्र मिळाले असल्याची माहिती बाबा रामदेव यांनी दिली. त्याचप्रमाणे कोरोनीलच्या वैज्ञानिक शोधपत्राची माहितीदेखील सार्वजनिक करण्यात आली आहे.