ज्योतिषशास्त्रावर रामदेव यांचा निशाणा; मुहूर्ताच्या नावावर लोकांची फसवणूक करुन कोट्यावधी लुटतात

अॅलोपॅथवरील वाद सुरू असतानाच आता योगगुरु रामदेव यांनी ज्योतिषशास्त्रावर निशाणा साधला आहे. सर्वच मुहूर्त देवानेच तयार करून ठेवले आहेत असे सांगत ज्योतिषी मात्र काळ, मुहूर्ताच्या नावावर लोकांची फसवणूक करतात असा आरोप करीत हा उद्योगच एक लाख कोटींचा असल्याचा दावादेखील केला. ते एका योग शिबिरात साधकांसोबत चर्चा करीत होते.

  हरिद्वार : अॅलोपॅथवरील वाद सुरू असतानाच आता योगगुरु रामदेव यांनी ज्योतिषशास्त्रावर निशाणा साधला आहे. सर्वच मुहूर्त देवानेच तयार करून ठेवले आहेत असे सांगत ज्योतिषी मात्र काळ, मुहूर्ताच्या नावावर लोकांची फसवणूक करतात असा आरोप करीत हा उद्योगच एक लाख कोटींचा असल्याचा दावादेखील केला. ते एका योग शिबिरात साधकांसोबत चर्चा करीत होते.

  ज्योतिषी बसल्या जागेवरूनच भविष्य सांगतात. ज्यावेळी पंतप्रधान मोदींनी पाचशे आणि एक हजारच्या नोटा बंद केल्या त्याची माहिती मात्र कोणालाच झाली नाही. कोरोना येणार आहे हे कोणत्याही ज्योतिषाने सांगितले नाही. त्यानंतर ब्लॅक फंगसही येणार हेसुद्धा सांगितले नाही असे बाबा रामदेव म्हणाले.

  यावेळी त्यांनी कोरोनिलवरही भाष्य केले. एकाही ज्योतिषाने कोरोनावरील उपचार रामदेवांच्या कोरोनिलमुळे होईल हे सांगितले नाही, असा टोमणादेखील त्यांनी हाणला. दरम्यान हिंदी व संस्कृत या भाषेबाबत भाष्य करताना इंग्रजीची री ओढणाऱ्यांवर टीका केली. हिंदी व संस्कृत या भाषा शिकायलाच हव्या असे सांगत भविष्यात गुरुकुलमध्ये शिकणारेच देश चालवतील, असा दावादेखील त्यांनी केला.

  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा
  हे सुद्धा वाचा