Rana's son shot at famous shire Munna; Shocking revelation in police investigation

    रायबरेली : प्रसिद्ध शायर मुन्नवर राणा यांचा मुलगा तरबेज राणा याच्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. पोलिस तपासात अनेक धक्कादायक खुलासा झाला आहे. राणा यांच्या मुलाने काका आणि चुलतभावांना गोवण्यासाठी स्वत: वर गोळी झाडून घेतल्याचे समजते.

    गुरुवारी रात्री रायबरेली पोलिसांनी मुनव्वर राणा यांच्या घरावर धाड टाकली. तपासावेळी पोलिसानी अत्याचार केल्याचा आरोप राणा यांच्या मुलीने केला आहे. रायबरेली पोलिसांनी लखनऊ पोलिसांच्या मदतीने मुन्नवर राणा यांच्या घरावर छापा टाकला. राणा यांची मुलगी सुमैया हिने पोलिसांच्या या छापेमारीबाबत नाराजी व्यक्त केली आहे.

    तबरेज राणा यांच्यावर गोळीबार केल्याप्रकरणी रायबरेली पोलिसांनी मोठा खुलासा केला आहे. पोलिस तपासणीनुसार, राणा यांच्या मुलाने काका आणि चुलतभावांना गोवण्यासाठी स्वत: वर गोळी झाडून घेतली. मालमत्तेच्या वादातून हा सर्व प्रकार घडला आहे.

    २९ जून रोजी, उत्तर प्रदेशच्या रायबरेली जिल्ह्यातील सदर कोतवाली परिसराच्या त्रिपुला चौकात, दुचाकीस्वारांनी प्रख्यात शायर मुन्नवर राणा यांचा मुलगा तबरेज राणा यांच्या कारवर हल्ला केला आणि गोळ्या झाडल्या. वास्तविक, त्रिपुलाच्या पेट्रोल पंपावर दुचाकीस्वारांनी दोन राउंड झाडल्या. दोन्ही गोळ्या तबरेज राणा यांच्या कारला लागली होती. मात्र, गोळीबारानंतर दोन्ही आरोपी पळून गेले.