बलात्कार आणि खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी केली फिल्मी स्टाईलमध्ये अटक, संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद ; काय आहे प्रकरण ?

अटक करण्यात आलेला आरोपी दरोडा आणि बलात्कारासह १४ गुन्हांमध्ये सामील होता. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सरस्वती तालुक्यातील अमरपुरा गावात एका ढाब्यावर तो पकडला गेला. आरोपीकडे पिस्तूल देखील होते. 

    बलात्कार, खंडणी आणि गंभीर गुन्ह्यातील आरोपीला अहमदाबाद शहरातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी रस्त्याच्या बाजूला असलेल्या ढाब्यातून अटक केली आहे. पोलिसांनी या आरोपीला फिल्मी स्टाईमध्ये अटक केली असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

    अटक करण्यात आलेला आरोपी दरोडा आणि बलात्कारासह १४ गुन्हांमध्ये सामील होता. गुजरातमधील पाटण जिल्ह्यातील सरस्वती तालुक्यातील अमरपुरा गावात एका ढाब्यावर तो पकडला गेला. आरोपीकडे पिस्तूल देखील होते.

    अहमदाबाद पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये बनसकांठा रहिवासी असलेल्या आरोपी किशोरला पकडण्यासाठी साध्या वेशात गुन्हे शाखेच्या तपास यंत्रणेचे अधिकारी गेले होते. पोलिसांनी एकमेकांना इशारा देऊन त्यांनी आरोपीला सिंगम स्टाईलमध्ये अटक केली आहे.