सहा वर्षाच्या नातवासमोर महिलेवर बलात्कार; आरोपी मोठ्या राजकीय पक्षाचे कार्यकर्ते

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच, दोन महिलांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करीत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. एका 60 वर्षीय एका पिडीत महिलेने, 6 वर्षाच्या नातवासमोर तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर, दुसऱ्या अल्पवयीन पिडीतेने अपहरण करत बलात्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

    कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच, दोन महिलांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपल्यावर बलात्कार केल्याचा आरोप करीत सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. एका 60 वर्षीय एका पिडीत महिलेने, 6 वर्षाच्या नातवासमोर तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तर, दुसऱ्या अल्पवयीन पिडीतेने अपहरण करत बलात्कार करण्यात आल्याचे म्हटले आहे.

    4 मे रोजी रात्री तृणमूलचे 5 कार्यकर्ते जबरदस्ती घरामध्ये शिरले आणि नातवासमोरच आल्यावर बलात्कार केला असे वृद्ध महिलेने सांगितले. तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी घरात लूट केल्याचा आरोप देखील या महिलेने केला आहे. ही घटना बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील घडली आहे. खेजुरी येथे भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाल्यानंतर तृणमूलच्या 100 ते 200 कार्यकर्त्यांनी त्यांच्या घराला घेराव घातला होता.

    घराला बॉम्बने उडवून देऊ, भाजपाचा प्रचार करणाऱ्यांना शिक्षा दिली दजाईल, अशा धमक्या त्या कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी वृद्ध महिलेच्या सुनेने घर सोडले. या घटनेनंतर शेजाऱ्यांनी दुसऱ्या दिवशी बेशुद्ध असलेल्या महिलेला रुग्णालयात दाखल केले होते. जावयाने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याकडे लक्ष दिले नाही. तृणमूलने बलात्कारासारख्या घटना घडवून आणल्या आहेत. पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे बंगालमधील या घटनांना प्रोत्साहन दिले जात आहे असे सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या अर्जात या महिलेने म्हटले आहे.

    हे सुद्धा वाचा