Rare Stone Baby found in the stomach; A woman in Chhattisgarh had a strange problem

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात एक अतिशय दुर्मीळ घटना समोर आली आहे. एका महिलेला पोटदुखीचा आणि पोट सुजल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे महिला पंडित जवाहरलाल नेहरू स्मृती चिकित्सा महाविद्यालयाच्या प्रसूतीरोग विभागात दाखल झाली. डॉक्टरांनी महिलेवर उपचार सुरू केले. महिलेच्या पोटात दुर्मीळ लिथोरपेडियन आढळून आले. त्याला स्टोन बेबीदेखील म्हटले जाते.

    रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात एक अतिशय दुर्मीळ घटना समोर आली आहे. एका महिलेला पोटदुखीचा आणि पोट सुजल्याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे महिला पंडित जवाहरलाल नेहरू स्मृती चिकित्सा महाविद्यालयाच्या प्रसूतीरोग विभागात दाखल झाली. डॉक्टरांनी महिलेवर उपचार सुरू केले. महिलेच्या पोटात दुर्मीळ लिथोरपेडियन आढळून आले. त्याला स्टोन बेबीदेखील म्हटले जाते.

    प्रसूतीरोग विभागाच्या प्रमुख प्रा. डॉ. ज्योती जयस्वाल यांच्या नेतृत्त्वाखाली महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि स्टोन बेबीला बाहेर काढण्यात आले. या स्टोन बेबीचे वय सात महिने आहे. या अर्भकाला मृतावस्थेत बाहेर काढण्यात आले. शस्त्रक्रियेनंतर महिलेची पोटदुखीची तक्रार थांबली. या महिलेला लवकरच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार आहे.

    गर्भाशयाच्या बाहेर अर्भकाचा विकास होऊ लागल्यास त्याचे रुपांतर पुढे स्टोन बेबीमध्ये होते, अशी माहिती डॉ. जयस्वाल यांनी दिली. अशा प्रकारच्या घटना अतिशय दुर्मिळ असल्याचे त्यांनी सांगितले. गर्भाशयाच्या बाहेर पोटात अर्भक वाढू लागल्यास लिथोपेडियन म्हणजेच स्टोन बेबी तयार होते. गर्भाशयात वाढणाऱ्या बाळाला पुरेशा प्रमाणात रक्तपुरवठा होतो. मात्र गर्भाशयाच्या बाहेरील अर्भकाला रक्तपुरवठा होत नसल्यान त्याचा मृत्यू होतो.