फोन टॅपिंग प्रकरण, चौकशीची घाई असेल तर प्रश्न पाठवा, उत्तरं देते, रश्मी शुक्लांचं समन्सला उत्तर

रश्मी शुक्ला हा एसआयडीमध्ये कार्यरत असण्याच्या काळात काही मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. महाराष्ट्राच्या सायबर सेल विभागाने हा हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने त्यांना हे समन्स बजावले आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये राहत असल्यामुुळे हैदराबाद पोलिसांनी मदत मुंबईच्या सायबर सेलनं घेतलीय.

    फोन टॅपिंग प्रकरणात चौकशीसाठी वरीष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना समन्स बजावण्यात आलंय. या समन्सला शुक्लांनी उत्तर दिलंय. शुक्ला यांच्या उत्तरामुळे आता या प्रकरणातील संघर्ष वाढण्याची शक्यता निर्माण झालीय. चौकशीची खूप गडबड असेल, तर प्रश्न पाठवा, अशी मागणी रश्मी शुक्ला यांनी केलीय.

    रश्मी शुक्ला हा एसआयडीमध्ये कार्यरत असण्याच्या काळात काही मंत्र्यांचे फोन टॅप केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. महाराष्ट्राच्या सायबर सेल विभागाने हा हैदराबादच्या डीजीपींच्या हस्तक्षेपाने त्यांना हे समन्स बजावले आहे. रश्मी शुक्ला या सध्या हैदराबादमध्ये राहत असल्यामुुळे हैदराबाद पोलिसांनी मदत मुंबईच्या सायबर सेलनं घेतलीय.

    रश्मी शुक्ला यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी हे समन्स बजावण्यात आलं असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. आज (बुधवार) त्यांची चौकशी होणार आहे. त्यासाठी त्यांनी सायबर पोलीस स्टेशनमध्ये हजर राहावं, असे आदेश देण्यात आलेत.

    एसआयडीमध्ये कार्यरत असताना त्यांनी काही मंत्र्यांचे फोन राजकीय कारणांसाठी टॅप केल्याचा आरोप ठेवण्यात आलाय. अशा प्रकारचं फोन टॅपिंग हे केवळ दहशतवादी कृत्यं, राष्ट्रघातक कारवाया किंवा परदेशातील दहशतवादी कारवाया यासारख्या कारणांसाठीच करता येतं. मात्र शुक्ला यांनी याव्यतिरिक्त राजकीय कारणांसाठी फोन टॅप केले का, हे पडताळून पाहण्यासाठी ही चौकशी होणार आहे.