RBI cash van accident

नोटा घेवून जाणाऱ्या आरबीआयच्या ट्रकला अपघात झाल्याची घटना चंदीगडमध्ये घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन ट्रकचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

    चंदीगड : नोटा घेवून जाणाऱ्या आरबीआयच्या ट्रकला अपघात(RBI cash van accident) झाल्याची घटना चंदीगडमध्ये घडली आहे. हा अपघात इतका भीषण होता की यात दोन ट्रकचा चेंदामेंदा झाला आहे. या अपघातात दोन पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. ट्रक एकमेकांवर आदळल्याने हा अपघात झाल्याचे समजते.

    हे तीन ट्रक चंदीगड रेल्वे स्टेशनवरून सेक्टर-17 मध्ये असलेल्या आरबीआय कार्यालयाकडे जात होते. या ट्रकमध्ये पैसे असल्याने या ताफ्याच्या मागे पुढे पोलिसांचा ताफा होता. तसेच ट्रकमध्येही पोलीस संरक्षण देण्यात आले होते. यावेळी सेक्टर 26 जवळ सर्वात पुढे असलेल्या पोलिसांच्या वाहनाने अचानक ब्रेक लावला. यामुळे मागोमाग असलेल्या पहिल्या ते दुसऱ्या ट्रकनाही ब्रेक लावला. मात्र तिसऱ्या ट्रकने ब्रेक न लावल्याने हा ट्र्क दुसऱ्या ट्रकला धडकला.

    ही धडक इतकी भीषण होती की या अपघातात संरक्षणासाठी असलेली महिला पोलीस ट्रकच्या केबिन मध्ये अडकली. अखेर कटरच्या साह्याने ट्रकची केबिन कापून या महिलेला बाहेर काढण्यात आले. या अपघातात या महिला पोलिस कर्मचारीचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे समजते.

    दरम्यान, या प्रकरणी बेजबाबदारपणे वाहन चालविणे आणि सुरक्षित अंतर न राखल्याच्या आरोपाखाली ट्रक चालक तेजिंदर सिंग आणि गुरबेज सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.