संत बाबा राम सिंह यांनी स्वतःला गोळी का मारली? बाबाजींचे सेक्रेटरी सांगतायत आत्महत्येमागचं कारण

१९९६ सालापासून बाबांचे शिष्य आणि सेक्रेटरी असणाऱ्या गुलाब सिंह यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. बाबा राम सिंह आंदोलकांना आर्थिक आणि इतर मदत सातत्यानं करत होते. ९ डिसेंबरला बाबाजींनी ५ लाख रुपयांची मदत आंदोलकांना पाठवून दिली होती. त्यानंतर स्वतः जाऊन त्यांनी चादरी आणि गोधड्यांचे वाटपही केले होते. बाबा रोज डायरी लिहित असत. शेतकऱ्यांचं हे दुःख आपल्याला बघवत नसल्याचं ते सातत्याने सांगत.

केंद्रीय कृषी कायदे मागे घ्यावेत, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पंजाबमधील लोकप्रिय संत बाब राम सिंह यांनी गोळी मारून घेत आत्महत्या केली. त्यानंतर त्यांना आनन-फानन इस्पितळात दाखल करण्यात आलं. मात्र तिथं पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.

१९९६ सालापासून बाबांचे शिष्य आणि सेक्रेटरी असणाऱ्या गुलाब सिंह यांनी याबाबत महत्त्वाची माहिती दिलीय. बाबा राम सिंह आंदोलकांना आर्थिक आणि इतर मदत सातत्यानं करत होते. ९ डिसेंबरला बाबाजींनी ५ लाख रुपयांची मदत आंदोलकांना पाठवून दिली होती. त्यानंतर स्वतः जाऊन त्यांनी चादरी आणि गोधड्यांचे वाटपही केले होते. बाबा रोज डायरी लिहित असत. शेतकऱ्यांचं हे दुःख आपल्याला बघवत नसल्याचं ते सातत्याने सांगत.

त्या दिवशी बाबाजी पुन्हा आंदोलनस्थळी पोहोचले होते. आपल्या शिष्यांना त्यांनी व्यासपीठावर जाण्याची सूचना केली. त्यांच्या आदेशानुसार सगळे व्यासपीठावर गेले. बाबा राम सिंह एकटेच गाडीत बसून होते. तिथे त्यांनी एक चिठ्ठी लिहिली. त्यात त्यांनी लिहिलं की शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी अनेकांनी आपली नोकरी सोडली. आपापले पुरस्कार परत केले. आता मी माझं शरीर समर्पित करत आहे. त्यानंतर त्यांनी शेजारी पडलेली पिस्तुल उचलून स्वतःला गोळी मारून घेतली.

सध्या सिव्हील रुग्णालयात बाबा राम सिंह यांच्या पार्थिवाचं शवविच्छेदन होत असून त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.